आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यपालांकडे मागणी:राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा; आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांची राज्यपालांकडे मागणी

औरंगाबाद9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीचे निवेदन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देताना रासपचे प्रदेशाध्यक्ष आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे. - Divya Marathi
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीचे निवेदन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देताना रासपचे प्रदेशाध्यक्ष आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे.
  • प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त झाल्यानंतर आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी उचललेले हे पहिले पाऊल होते

राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने (रासप) नवनियुक्त महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे, राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश मुख्य महासचिव बाळासाहेब दोडतले यांच्यासह सुशीलकुमारजी पाल, राजेभाऊ फड यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यात पूर्णत: ओला दुष्काळ जाहीर करावा आणि खरीप २०१८ हंगामातील शेतकऱ्यांना दुष्काळ मदतनिधी तत्काळ वितरित करावा, या महत्त्वाच्या मागणीसाठी त्यांनी मुंबईतील राजभवनात त्यांची भेट घेतली. या वेळी राज्यपाल महोदयांचे स्वागत करून त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.

प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त झाल्यानंतर आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी उचललेले हे पहिले पाऊल होते. त्यांनी राज्यपालांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. या वेळी त्यांनी यापुढेही शेतकऱ्यांच्या हितासाठी लढा देऊ, त्यांच्यासाठी पावले उचलून विविध उपक्रम राबवण्याचा मनोदय आमदार डॉ. गुट्टे यांनी व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...