आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेशाचा तिढा सुटला:फार्मसीची घटलेली विद्यार्थी संख्या कायम; प्रवेश नोंदणी बुधवारपर्यंत

औरंगाबाद3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाच्या जाचक अटींमुळे साडेपाच ते सहा महिन्यांपासून खोळंबलेली प्रवेश प्रक्रिया अखेर सुरू होणार आहे. बुधवार, ३० नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करता येईल. प्रवेश प्रक्रिया डिसेंबरमध्ये पूर्ण होईल. कौन्सिलने प्रवेश प्रक्रिया राबविण्यापूर्वी महाविद्यालयांना मान्यतेसाठी घटवलेली संख्या यंदा पुन्हा जैसे थे ठेवली आहे. यामुळे प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला असला तरी वेळापत्रक मात्र कोलमडले आहे.

२०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया ऑगस्टमध्येच पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने मान्यतेपूर्वी सर्व सुविधा, क्षमतेच्या अटींची फेरपडताळणी करण्यास सांगितले होते. जिथे प्रवेश क्षमता १०० आहे ती घटवून ५० केली होती. मात्र आता ती पूर्ववत केली आहे. मंगळवारी केवळ डी.फार्मसीचेच वेळापत्रक जाहीर करण्यात आले. प्रवेश फेऱ्या डिसेंबरमध्ये होतील. नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात जानेवारी २०२३ मध्येच होणार आहे.

असे आहे डी. फार्मसीचे नवे वेळापत्रक {३० नोव्हेंबरपर्यंत: रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट्स अपलोड करता येतील. {१ डिसेंबर : तात्पुरती यादी रोजी जाहीर होईल. { २ ते ४ डिसेंबर : आक्षेप असल्यास ऑनलाइन दुरुस्त करता येईल. {५ डिसेंबर : अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होईल. { ६ ते ८ डिसेंबर : पहिल्या फेरीतील ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी मुदत {९ डिसेंबर : जागांचे वाटप { १० ते १२ डिसेंबर : महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करायचे आहेत. { १३ डिसेंबर : दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील जाहीर होईल. { १४ व १५ डिसेंबर : दुसऱ्या फेरीतील ऑप्शन फॉर्म भरता येईल. { १६ डिसेंबर : प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जाहीर होईल. {१७ ते १९ डिसेंबर : मिळालेली जागा स्वीकारून महाविद्यालयात रिपोटिंग. { २० डिसेंबर : तिसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील जाहीर होईल.

अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे लक्ष्य प्रवेश उशिरा होत असल्याने सत्र वेळेत पूर्ण करायचे असेल तर कमी वेळात अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल. - डॉ. व्ही. के. मौर्य, प्राचार्य शासकीय औषधनिर्माणशास्त्र

डिसेंबरमध्ये प्रक्रिया पूर्ण केली जाईल यंदा वेळापत्रकात बदल झाल्यामुळे प्रवेश प्रक्रिया डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येईल. - डॉ. उमेश नागदेवे, तंत्रशिक्षण सहसंचालक

बातम्या आणखी आहेत...