आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:ग्रामीण भागात कोरोनाबाधितांच्या आकड्यांमध्ये घट, शुक्रवारी जिल्ह्यात केवळ 7 बाधितांची नोंद

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागातील कोरोना बाधितांच्या आकड्यात घट होत असल्याचे चित्र दिसून आले आहे. दररोज २० च्या घरात कोरोनाबाधितांची संख्या आढळून येत असताना शुक्रवार दि. १३ ऑगस्ट रोजी औरंगाबाद जिल्ह्यात केवळ ७ कोरोनाबाधित आढळून आल्याने समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शहरी भागात कोरोना विषाणूने काढता पाय घेतला असला तरी ग्रामीण भागात मात्र बाधितांचा आकडा खाली येत नव्हता. दररोज २० च्या आसपास बाधीत आढळून येत होते. यामुळे ग्रामीण भागात चाचण्या वाढविण्यात आल्या. घरोघरी जाऊन तपासण्या करण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच जनजागृतीवर देखील भर दिला जात आहे. दरम्यान, ८ ऑगस्ट रोजी हा आकडा ८ पर्यंत खाली आला. मात्र त्यानंतर पुन्हा तो ३० पर्यंत गेला. आरोग्य यंत्रणेने पुन्हा दक्षता घेत जनजागृतीवर भर देणे सुरु केले आहे. परिणामी शुक्रवार, १३ रोजी जिल्ह्यात केवळ ७ कोरोनाबाधित आढळून आल्याने आरोग्य विभागालाही दिलासा मिळाला आहे.

ऑगस्ट महिन्यातील हा सर्वात कमी आकडा आहे. ऑगस्ट महिन्यात १ रोजी २७, २ रोजी १४, ३ रोजी २६, ४ रोजी २८, ५ रोजी १०, ६ रोजी २३, ७ रोजी १६, ८ रोजी ८, ९ रोजी ११, १० रोजी १७, ११ रोजी १७, १२ रोजी १८ रुग्ण आढळले तर काल १३ रोजी हा आकडा केवळ ७ पर्यंत खाली आला आहे.

चार तालुक्यात एकही रुग्ण नाही -
जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव आता कमी होत आहे. शुक्रवार, १३ रोजी जिल्ह्यातील गंगापूर, कन्नड, खुलताबाद आणि सोयगाव तालुक्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. तर औरंगाबाद १, फुलंब्री १, सिल्लोड १, वैजापूर २ आणि पैठण तालुक्यात २ रूग्ण आढळले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ६० हजार २६६ पॉझिटिव्ह रुग्ण होऊन गेले असून, १६० पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...