आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात पक्षकार, वकील, न्यायमूर्ती आणि कर्मचाऱ्यांसाठी रुग्णवाहिकेची मागणी वकील संघातर्फे करण्यात आली होती. यासंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे निवेदन सादर केल्यानंतर त्यांनी तात्काळ रुग्णवाहिका मंजूर केली. रुग्णवाहिकेचे लोकार्पण न्या. संभाजी शिंदे, न्या. आर. डी. धानुका व न्या. रवींद्र घुगे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (१ एप्रिल) करण्यात आले. सीएसआर निधीतून मनपाला दोन कोटी रुपयांच्या सहा रुग्णवाहिका दिल्या होत्या. या रुग्णवाहिका मनपात पाच महिन्यांपासून उभ्या आहेत. खंडपीठ वकील संघाने मनपा आयुक्त आणि आरोग्य अधिकारी यांना पत्र लिहून एक रुग्णवाहिका प्रदान करण्याची विनंती केली. मनपा प्रशासकांनी आपल्या अधिकारातील रुग्णवाहिका दिली. रुग्णवाहिकेला प्रशासनाने खंडपीठ परिसरात थांबवण्याची परवानगी दिली.
याप्रसंगी वकील संघाचे अध्यक्ष अॅड. नितीन चौधरी, सचिव सुहास उरगुंडे, ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र देशमुख, विजयकुमार सपकाळ, अॅड. डी. आर. काळे, वकील संघाचे उपाध्यक्ष अॅड. प्रतिभा भराड, अॅड. संदीप आंधळे, अॅड. सुजाता पुरी, अॅड. संगीता देसरडा, अॅड. योगिता थोरात, अॅड. अजित काळे, अॅड. अजित कडेठाणकर, अॅड. अमरजितसिंह गिरासे, अॅड. विष्णू पाटील मदन, अॅड. विक्रांत वलसे, अॅड. महेश धपाटे, अॅड. सुमीत अग्रवाल, अॅड. सुरेखा महाजन, अॅड. आशा शिरसाठ, अॅड. विठ्ठल दिघे, बाळासाहेब पाटील, अतुल जगताप, दिलीप पटेकर आदींची उपस्थिती होती. अॅड. टोपे यांचा सत्कार: रुग्णवाहिका मिळावी यासाठी अॅड. संभाजी टोपे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. यसबद्दल अॅड. टोपे यांचा न्या. आर. डी. धानुका यांनी सत्कार केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.