आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनटायटल्ड प्रोजेक्ट:यशराज फिल्म्सच्या चित्रपटात दिसू शकतात दीपिका-कॅटरिना

छत्रपती संभाजीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दीपिका पदुकोण आणि कॅटरिना कैफ अातापर्यंत एकाही चित्रपटात एकत्र दिसल्या नाहीत. पण आता दोघीही यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्सच्या पुढील चित्रपटात दिसणार आहेत. ‘पठाण’ आणि ‘वॉर’चे पटकथा लेखक श्रीधर राघवन म्हणाले, “दीपिका आणि कॅटरिना आदित्य चोप्राच्या स्पाय युनिव्हर्सच्या चित्रपटात एकत्र दिसू शकतात. लवकरच यावर काम सुरू होणार आहे. यावर राघवन म्हणाले, हाे, असे चित्रपट कमी आहेत मात्र आम्ही ही उणीव भरून काढणार आहोत. महिला आधारित हेरगिरीवरील चित्रपटाची तयारी सुरू आहे. ‘पठान’मध्ये दीपिकाने रुबिना मोहसिन नावाच्या एक एजंटची भूमिका साकारली होती. दुसरीकडे, ‘टायगर’ सिरीजमध्ये कॅटरिनाने जोयाच्या रूपात एजंटची दमदार भूमिका साकारली होती. या चित्रपटांमध्ये दोघींची धान्सू अॅक्शन पाहायला मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...