आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराझालानी टुल्स मैदानावर झालेल्या टी-20 स्पर्धेत यंग इलेव्हन संघाने व्हिजन ट्राॅफी आपल्या नावे केली. फायनलमध्ये यंग इलेव्हन संघाने गुरूकुल अकादमी संघावर 9 गड्यांनी विजय मिळवत चॅम्पियन बनला. सामन्यात सय्यद अब्दुल वाहिद सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना यंग इलेव्हनचा डाव 17.1 षटकांत अवघ्या 82 धावांवर संपुष्टात आला. गुरूकुल संघ हे लक्ष्य सहज गाठेल असे वाटत होते. मात्र, गुरूकुल संघ 19.1 षटकांत 73 धावांवर ढेपाळला. यात आघाडीचे तीन फलंदाज खालिद जमान (8), इशांत राय (4) व योगेश चौधरी (6) आल्यापावली तंबूत परतले.
अजय काळेने एकाकी लढत देत सर्वाधिक 27 धावा काढल्या. त्याने 33 चेंडूंत 2 चौकार व 1 षटकार खेचला. तळातील फलंदाज मो. वसिमने 11 धावा जोडल्या. इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. यंग इलेव्हनकडून सय्यद अब्दुल वहिदने 13 धावा देत 4 गडी बाद केले. प्रविण क्षिरसागरने 3 गडी बाद केले. अमित पाठक व स्वप्निल चव्हाणने 1-1 गडी टिपला.
तरडेच्या 28 धावा, रागीचे 3 बळी :
यंग इलेव्हनच्या डावात सलामीवीर ऋषिकेश तरडेने सर्वाधिक 22 चेंडूंचा सामना करताना सर्वाधिक 28 धावांची खेळी केली. त्याने 4 चौकार व 1 षटकार खेचला. स्वप्निल चव्हाणने 13 व राहुल शर्माने 12 धावा जोडल्या. गुरूकुलकडून हरमितसिंग रागीने 25 धावांत 3 बळी घेतले. प्रदीप जगदाळे व ऋषिकेश नायरने प्रत्येकी 2 बळी घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.