आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदवी परीक्षा गोंधळ:तीन सदस्यीय समितीकडून होणार चौकशी; जबाबदारी विद्यापीठाची असल्याचे प्रशासनाने केले मान्य

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एका बाकावर तीन विद्यार्थी बसून, परीक्षेच्या पहिल्याच दिवशी झालेली विद्यार्थ्यांची गैरसोय आणि ऐनवही देण्यात आलेल्या परीक्षा केंद्रावरील अतिरिक्त विद्यार्थी संख्येमुळे पदवी परीक्षेत गोंधळ निर्माण झाला होता. या प्रकरणी आता विद्यापीठ प्रशासनाने आपलीच चुक झाल्याचे मान्य केले असून, झालेलेल्या प्रकरणात अतिरिक्त विद्यार्थी संख्या परीक्षा केंद्रावर झालीच कशी? याच्या चौकशीसाठी तीन सदस्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. परीक्षेसाठी परीक्षा केंद्र तर नेमावेच लागणार असल्याची माहिती सोमवारी कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी दिली.

ऐनवेळी बदलले केंद्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या पदवीच्या विविध अभ्याक्रमांच्या परीक्षेस 1 जून पासून सुरुवात करण्यात आली. या परीक्षेसाठी एकूण 225 परीक्षा केंद्र नेमण्यात आले असून, 1 लाख 99 हजार 35 विद्यार्थी या पदवी परीक्षेला बसले आहेत. परंतु परीक्षेच्या दिवसापर्यंत तीन वेळा विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र बदलण्यात आले. जिथे चारशे ते साडेचारशे विद्यार्थी विजेंद्र काबरा या महाविद्यालयात देण्यात आले होते. तिथे यादी नाव नाही परंतु हॉलतिकीट असलेले साडेसातशेहून अधिक विद्यार्थी ऐन पेपरच्यावेळी देण्यात आल्याने परीक्षा केंद्रावर एकच गोंधळ उडाला होता. ऐनवेळी आलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवता येणार नाही. असे कारण पुढे करत दाटीवाटीने एका बाकावर तीन ते चार विद्यार्थी बसून पेपर घेण्यात आला. या प्रकारामुळे विद्यापीठाच्या परीक्षा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला. जर सुविधा आहेत की नाही हे पाहून परीक्षा केंद्र दिले जाते तर मग केंद्रावर किती क्षमता आहे. याचीही माहिती विद्यापीठाला नव्हती का? असा सवाल विद्यार्थी, विद्यार्थी संघटनांनी उपस्थित केला.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांकडून दखल

या प्रकाराची गंभीर दखल उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घेतल्यानंतर परीक्षा केंद्र बदलण्यात आले. परंतु हा प्रकार नेमका कशामुळे झाला. याचे खापर एकमेकांवर फोडणाऱ्या विद्यापीठ प्रशासनानेच अखेर आपली चुक मान्य केली असून, विद्यापीठाचा परीक्षा विभागच याला जबाबदार असल्याचे कुलगुरुंनी सांगत तीन सदस्यांची समिती चौकशीसाठी नेमण्यात आली असून, सुविधांच्या अभावाबाबत विजेंद्र काबरा महाविद्यालयाकडूनही खुलासा मागविण्यात आल्याचे कुलगुरु डॉ. येवले यांनी सांगितले.

सर्व केंद्रांची होणार तपासणी

परीक्षेच्या पहिल्याच दिवशी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे वास्तव समोर आले. परीक्षा केंद्र देतांना आणि परीक्षा केंद्रासाठी विद्यापीठाला माहिती पाठविणाऱ्या केंद्रांनी दिलेली माहिती चुकीची आढळून आल्यानंतर आता विद्यापीठ प्रशासनाला जाग आली असून, सर्व परीक्षा केंद्रांची पुर्नरचना करण्याबरोबरच केंद्रांची तपासणी करण्यात येणार असल्याचे कुलगुरुंनी सांगितले. परीक्षा केंद्रावर किती क्षमता आहे. त्या तुलनेत सुविधा आहेत की नाही याची सर्व तपासणी केली जाणार असल्याचेही कुलगुरु म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...