आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद-नगर रेल्वे मार्ग नफ्यात:अंतिम भूमापन सर्व्हेसाठी रेल्वे बोर्डाकडून विलंब; मार्गाच्या प्रस्तावाची छाननी पूर्ण

औरंगाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 15 मे 2022 मध्येच एकत्रित प्रस्ताव सुपुर्द करण्यात आला

मराठवाड्याच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरणारा औरंगाबाद-नगर रेल्वेमार्गाच्या सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण झालेले असताना अद्याप मात्र यासंबंधीची घोषणा करण्यात आलेली नाही. सर्व्हेक्षणात तोट्यात दाखवण्यात आलेला जालना-जळगाव मार्गाच्या अंतिम भुखंड मोजणीचे आदेश रेल्वे बोर्डाकडून प्राप्त झालेले आहे. सर्व सर्व्हेक्षणात नफ्यात असलेल्या बहुचर्चित औरंगाबाद- नगर रेल्वेमार्गासाठी अद्याप रेल्वे बोर्डाकडून कुठलेच परिपत्रक काढण्यात आलेले नाही. विदर्भ, खान्देश, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिणेकडील राज्यांना जाण्यासाठी संबंधित मार्ग महत्वपूर्ण ठरणार आहे.

मार्गाच्या प्रस्तावाची छाणनी पूर्ण झाली आहे. आर. ओ. आर. ( रिटर्न ऑन रेव्हेन्यू) सकारात्मक आहे. मार्गासंबंधी एकत्रित प्रस्ताव 15 मे 2022 रोजी सुपुर्द करण्यात आला. मार्गावरून किती वाहतुक होईल, उत्पन्न किती मिळू शकेल, प्रवाशी व मालवाहतुकी संबंधी सर्व्हेक्षण पूर्ण झाले आहे. मराठवाड्यातील उद्योजक आणि केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी औरंगाबाद-नगर मार्गासंबंधी पाठपुरावा केला.

विदर्भ आणि खान्देश मार्गांचे सर्व्हेक्षण

औरंगाबाद ते जळगाव भुसावळ मार्गासंबंधी रावेरच्या भाजप खासदार रक्षा खडसे यांनी मागणी केली होती. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री म्हणून रावसाहेब दानवे यांना बढती मिळाल्यामुळे जालना-जळगाव मार्गास अंतिम मंजुरी मिळाली. जालना-जळगाव मार्गापेक्षा औरंगाबाद जळगाव मार्गाला महसूल अधिक आहें. जालना खामगाव या शंभर वर्षांपासूनच्या प्रलंबित मार्गाला मान्यता मिळाली. जालना-जळगाव व जालना-खामगाव मार्गाच्या अंतिम भुखंड सर्व्हेच्या कामाची निविदा 17 मार्च 2022 ला मंजूर झाली असून 31 ऑगस्ट 2022 पर्यंत मार्गाची मार्किंग अंतिम करण्याचे निर्देश आहे. औरंगाबाद भुसावळ मार्गाचा ड्रोन द्वारे सर्व्हे झाला. औरंगाबाद बुलढाणा खामगाव मार्गासंबंधीची वित्तीय छाणनी झाली आहे. मार्गात काही दुरूस्ती आहेत.

उस्मानाबाद-बीड-औरंगाबाद

संबंधित मार्गाच्या वाहतुकीसंबंधीचे सर्व्हेक्षण पूर्ण झाले आहे. प्रस्तावाची पूर्णपणे छानणी 30 जून 2022 रोजी झाली असून प्रस्तावही सुपुर्द करण्यात आला आहे. आर्थिक प्रस्तावाची छाणनी झाली आहे. वाहतुकीसंबंधीचा अहवाल 8 मार्च 2022 रोजी रेलवे बोर्डास सादर करण्यात आला आहे. मनमाड येथील स्थानकावर प्लॅटफॉर्म अपुरा पडत असल्यामुळे तेथून औरंगाबाद आणि दाैंडकडे जाणाऱ्या रेल्वेना ट्रॉफिक जामचा सामना करावा लागत आहे. भविष्यात ही अडचण दूर करण्यासाठी रेल्वेने आता मनमाडला न थांबता रेल्वेंसाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि दिल्लीकडे जाता यावे यासाठी पुल मंजूर केला. औरंगाबाद अंकाई दुहेरीकरणाचे अंतिम भूखंड मोजणीला मान्यता प्रदान करण्यात आली होती. यासंबंधी प्रत्यक्ष सर्व्हेक्षणात निधी ठेवण्यात आला होता. त्यानुसार मार्किंगचे सर्व्हेक्षण पूर्ण झाले आहे. आता प्रत्यक्ष कामासाठी निधी प्राप्त झाल्यानंतर कामास सुरूवात होईल.

बातम्या आणखी आहेत...