आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद:हर्सूल टी-पॉइंट येथे संत रविदासांचा पुतळा उभारण्याची मागणी; प्रत्येक वॉर्डात जयंती

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात १ लाखाहून अधिक समाजबांधव असताना संतशिरोमणी गुरू रविदास यांचा पुतळा नाही. हर्सूल टी- पॉइंट या ठिकाणी पुतळा उभारावा अशी मागणी संतशिरोमणी रविदास केंद्रीय जयंती महोत्सव समितीचे उपाध्यक्ष गजानन जोहरे यांनी केली. जयंतीनिमित्त रामनगर येथून रॅली काढण्यात आली. दोन वर्षांपूर्वीच्या तुलनेत यंदा वाहन रॅलीत ९०० हून अधिक समाजबांधव सहभागी झाले होते. संतशिरोमणी गुरू रविदास जयंतीनिमित्त टीव्ही सेंटर येथील संत रविदास मंदिरात रविवारी अध्यक्ष विकी फुलमाळी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून ध्वजारोहण करण्यात आले. रामनगर येथून वाहन रॅली काढण्यात आली. रॅलीला पोलीस सहआयुक्त बालाजी सोनटक्के यांनी हिरवी झेंडी दाखवली. संजयनगर- रविदासनगर येथे मूर्तिपूजन केले.

क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले. सिडको बसस्टँड येथे वसंतराव नाईक पुतळ्यास अभिवादन करून पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले. टीव्ही सेंटर येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. या वेळी ८०० ते ९०० दुचाकीस्वारांचा सहभाग होता. टीव्ही सेंटर येथील संत रविदास मंदिरात परिसंवाद झाला. केंद्रीय समितीच्या वतीने समाजबांधवांची संख्या, प्रश्न जाण्ून घेण्यासाठी पहिल्यांदाच ५५ वाॅर्डात जयंती साजरी केली. मुकुंदवाडी येथे १०० मुलांना वह्या वाटप केली, घाटीत २०० जणांना अन्नदान केले.

पदमपुरा येथे रविदास जयंती साजरी पदमपुरा येथे सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले. याप्रसंगी माजी महापौर नंदकुमार घोडेले, गजानन बारवाल, चर्मकार संघटनेचे भरत बरथुने यांची उपस्थिती होती. सायंकाळी शहरात शोभायात्रा काढून जयंती साजरी करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...