आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा क्रांती मोर्चा:कोपर्डीतील नराधमांना फाशी देण्याची मागणी ; मराठा क्रांती मोर्चातर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन

औरंगाबाद17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठा आरक्षणासह सर्वच मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले. त्यामध्ये कोपर्डीतील नराधमांना फाशी द्या, मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करा यासह विविध मागण्यांचा समावेश आहे. तातडीने सर्व मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून ५० टक्के आरक्षण लागू करावे, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरसकट कर्जमुक्ती व शेतमालास हमीभाव मिळावा, यासाठी कायदा करावा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करा, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पूर्ण क्षमतेने सुरू करा. सारथी संस्थेला भरघोस निधी द्यावा. गोरगरीब मराठा मुला-मुलींना केजी टू पीजीचे शिक्षण मोफत मिळावे आदी मागण्यांकडे सरकारने लक्ष देऊन सर्व मागण्या पूर्ण कराव्यात, अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा राज्य समन्वयक विजय काकडे पाटील, प्रा. चंद्रकांत भराट, रेखा वाहटुळे, अॅड. सुवर्ण मोहिते आदींनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...