आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

होम स्वीट होम:कोरोना काळातही नव्या घरांच्या मागणीत वाढ,मुंबई, पुण्यात सेकंड होमकडे कल, औरंगाबादेत नव्या घरांना मागणी

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वीलेखक: महेश जोशी
  • कॉपी लिंक
  • राज्यातील शहरांत फ्लॅट, घरांच्या बुकिंगला वेग; किमतीत मात्र घट नाही

कोरोना काळात मुंबई-पुण्यात नवीन घरांना मागणी घटली असताना औरंगाबादेत गतवर्षीच्या तुलनेत या काळात घरांची विक्री १० ते १५ टक्क्यांनी वाढली आहे. गृहकर्जाची सहज उपलब्धता, घटलेले व्याजदर व रेडी टू मूव्ह प्रकल्पांमुळे स्वप्नातील घर साकारण्यासाठी हीच योग्य वेळ असल्याची धारणा झाल्याने नव्या घरांना मागणी वाढत आहे. मुंबई, पुणे व ठाण्यात नवीन घरांची मागणी थंडावली असली तरी या शहरांत सेकंड होमकडे कल वाढला आहे.

कोराेना काळात घरमालकांशी वितुष्ट आलेले भाडेकरूही स्वत:च्या घरासाठी गंभीर झाले आहेत. घरांच्या किमती कमी झालेल्या नाहीत, हे विशेष. परगावी नोकरी करणाऱ्यांनाही कोरोनाच्या काळात औरंगाबादेतील घराचे महत्त्व पटले. वर्क फ्रॉम होम असूनही औरंगाबादेत घर नसल्याने नोकरीच्या ठिकाणी अडकून पडावे लागले. यामुळे शहरवासीयांसोबतच बाहेरगावी राहणाऱ्यांकडून औरंगाबादेत घरांची मागणी वाढल्याची माहिती बांधकाम व्यावसायिकांची संघटना क्रेडाईचे राज्य उपाध्यक्ष रवी वट्टमवार यांनी दिली. ३५ ते ४५ लाखांच्या आतील घरांच्या बुकिंगला वेग आला आहे.

अनलॉकनंतर मागणी वाढण्याची आशा
- सेविल्स इंडियाच्या अहवालानुसार मुंबई, पुण्यासह मोठ्या महानगरात बांधकाम व्यवसायाला पूर्ववत होण्यासाठी वर्ष लागेल.
- हाउसिंग डॉट कॉमनुसार, ९ प्रमुख शहरांत घर विक्रीत २५ ते ५०% घट झाली. २१% ग्राहक लगेच तर ७९% वर्षभरानंतर घर खरेदीचा निर्णय घेतील.
- इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्च संस्थेनुसार, यंदा व गतवर्षीच्या मार्च ते जुलैच्या तुलनेत घरांची विक्री २५ ते ३५% घटली आहे. मात्र, कोरोनासारखे संकट पुन्हा उद्भवले तर शहराजवळ, निसर्गाच्या सान्निध्यात सुरक्षित सेकंड होमकडे कल वाढल्याचे इनमासो संस्थेच्या पाहणीतून समोर आले आहे.
- अॅनारॉकच्या संस्थेच्या अहवालानुसार, एप्रिल ते जून या तिमाहीत मुंबईतील घरांची विक्री ६३ टक्के, पुण्यात ७० टक्के तर ठाण्यात ५६ टक्के घट झाली आहे.

मागणीची ५ कारणे
- किरायाच्या घरात सुरक्षेचा प्रश्न. पगार घटला तरी किराया जैसे थे. यावरून मालकाशी वाद
- गृहकर्जासाठी बँका सकारात्मक. व्याजदर कधी नव्हे एवढे कमी
- प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ.
- घर घेण्याचे आधीपासून नियोजन. कोरोनामुळे प्रत्यक्षात आले
- कोरोनामुळे कुटुंबासोबत राहण्याचे महत्त्व पटले.

किमती कमी होणे अशक्य
कामगार, सिमेंट, स्टील महागले आहे. बँकेचे हप्ते सुरू आहेत. मुंबई-पुण्यात २५ ते ५० हजार रुपये चौरस फूट तर आपल्याकडे २ ते ६ हजार रुपये दर आहे. आधीच दर कमी असल्याने घराच्या किमती कमी होणे शक्य नाही. मुंबई-पुण्यासारखे औरंगाबादेत घर-कार्यालयातील अंतर खूप नसल्याने वर्क फ्रॉम होमसाठी जागा ठेवण्याची गरज नसल्याचे वट्टमवार म्हणाले.

बुकिंग वाढली, मुद्रांक शुल्क १००० रुपये करावे
नवीन घरांेच्या विचारणा आणि बुकिंग वाढल्या आहेत. सरकारने सरसकट घराचे मुद्रांक शुल्क हजार रुपये करावे िकंवा आहे त्यात कपात केली तर सर्वसामान्यांना अजून स्वस्तात घर मिळेल. - रवी वट्टमवार, उपाध्यक्ष, क्रेडाई, महाराष्ट्र