आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्याजमाफी:मालमत्ता करात सवलतीची‎ महापालिकेकडे मागणी‎ ‎

छत्रपती संभाजीनगर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे व मुंबई महापालिकांप्रमाणे छत्रपती‎ संभाजीनगर महापालिकेनेही मालमत्ता‎ करामध्ये नागरिकांना सवलत आणि‎ व्याजमाफी द्यावी अशी मागणी माजी‎ नगरसेवक गौतम खरात, गौतम लांडगे, प्रकाश‎ निकाळजे, कृष्ण बनकर आणि मिलिंद दाभाडे‎ यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.‎ चालू वर्षी मालमत्ता कराच्या अत्यल्प‎ वसुलीमुळे महापालिकेच्या तिजोरीवर परिणाम‎ झाला आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती‎ डबघाईला आली असल्याने ही सवलत‎ दिल्यास नागरिकांचे मालमत्ता कर भरण्याचे‎ प्रमाण वाढेल असे त्यांचे म्हणणे आहे.‎

महानगरपालिका प्रशासन दरवर्षी फेब्रुवारीमध्ये‎ अशा प्रकारे करात व व्याजात पन्नास टक्के‎ सवलत देत असल्याकडे त्यांनी प्रशासनाचे‎ लक्ष वेधले.‎ महाराष्ट्र शासनाने पुणे महापालिकेसाठी‎ करामध्ये दिलेल्या ४० टक्के सवलतीच्या‎ निर्णयानुसार स्थानिक महापालिकेनेही ही‎ सवलत द्यावी, अशी त्यांची मागणी आहे.‎ प्रशासनाने हा निर्णय घेतल्यास शहरातील‎ असंख्य नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये मालमत्ता‎ कर भरायला पुढे येतील आणि महापालिकेच्या‎ तिजोरीमध्ये या शेवटच्या अर्थसंकल्पीय‎ महिन्यामध्ये भर पडेल, अशी आशा आहे.‎

बातम्या आणखी आहेत...