आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विमा:राज्यातील 52 हजार 430 स्वस्त धान्य दुकानदारांना विमा कवच देण्याची राज्य संघटनेेची शासनाकडे मागणी, शासनाच्या दुर्लक्षामुळे संघटनेतून नाराजी

हिंगोलीएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • शासनाने पंतप्रधान कल्याणकारी योजनेतून लाभार्थ्यांना पाच किलो तांदूळ वाटपाचा निर्णय घेतला आहे

राज्यात गरजू लाभार्थ्यांना सध्याच्या परिस्थितीत स्वस्त धान्याचे वाटप करणाऱ्या ५२ हजार ४३० स्वस्त धान्य दुकानदारांना शासनाने विमा कवच द्यावे अशी राज्य संघटनेने वेळोवेळी शासनाकडे केली असून या मागणीकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संघटनेचे राज्य सचिव गंगाधर म्हमाणे यांनी दिव्य मराठीशी बोलतांना केला आहे.

या संदर्भात ते म्हणाले की, राज्यात सध्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्वच यंत्रणा कामाला लागल्या आहेत. पोलिस विभाग, आरोग्य विभागासोबतच इतर कर्मचारी देखील ग्रामीण भागात सर्वेक्षण करून रुग्ण सेवा करीत आहेत. त्यांचे काम कौतूकास्पद आहे. त्यांना शासनाने ५० लाख रुपयांचे विमा कवच दिले आहे. तर दुसरीकडे या काळात कोणाही उपाशी राहू नये यासाठी शासनाने स्वस्त धान्य दुकानदारामार्फत अन्नसुरक्षा, अंत्योदय योजनेसोबतच इतर लाभार्थ्यांना धान्य वाटपाच्या सुचना दिल्या आहेत. त्यानुसार राज्यातील  ५२ हजार ४३० दुकानदार दररोज सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत धान्य वितरीत करीत आहेत. शहरी भागा सोबतच ग्रामीण भागातही धान्याचे वितरण केले जात आहे. त्यामुळे दुकानदारांचा चोविस तास लाभार्थ्यांशी संपर्क येत आहे. मात्र स्वस्त धान्य दुकानदाराच्या या कामाकडे शासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राज्यातील सर्व दुकानदारांना विमा कवच द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात शासनाकडे वेळोवेळी निवेदन दिले आहे. मात्र अद्यापही शासनाने त्यावर निर्णय घेतला नाही. शासनानेही स्वस्त धान्यदुकानदारांच्या कुटुंबियांचा विचार करता विमा कवच द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, शासनाने पंतप्रधान कल्याणकारी योजनेतून लाभार्थ्यांना पाच किलो तांदूळ वाटपाचा निर्णय घेतला आहे. मात्र सदर तांदूळ वाटप करण्यासाठी धान्य दुकानदारांना मोबदला दिला जाणार नाही. या निर्णयाचा शासनाने विचार करून अन्नसुरक्षा व अंत्योदय योजनेच्या धर्तीवर तांदूळ वाटपावरही मोबदला द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. या शिवाय पुढील काही दिवसांपर्यंत दर आठवड्याला दुकानदारांची आरोग्य तपासणी केली पाहिजे अशी मागणीही करण्यात आली आहे.  या मागण्यांचा शासनाने सकारात्मक विचार केला पाहिजे असेही म्हमाणे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...