आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहन नोंदणीच्या जाचक अटी रद्द करा:भारतीय वाहन खरेदी-विक्री संघाच्या शिष्टमंडळाची आरटीओकडे मागणी

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुने वाहन खरेदी-विक्री, नाेंदणीतील जाचक अटी रद्द कराव्यात, या मागणीचे निवेदन शुक्रवारी (१८ नाेव्हेंबर) भारतीय वाहन खरेदी-विक्री संघाच्या वतीने प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मैत्रेवार यांना देण्यात आले. आरटीओत विविध कामांसाठी गेल्यानंतर तसेच वाहनांची नाेंदणी करताना काेराेना लसीकरण प्रमाणपत्र दाखवणे बंधनकारक आहे. आता काेराेनाचे निर्बंध शिथिल झाले आहेत. त्यामुळे ही अट रद्द करावी. ओरिजिनल आधार कार्ड दाखवणे, माेबाइल नंबर आधार कार्डशी लिंकची सक्ती नकाे, बिफाेर मीची अट रद्द करावी, गाडी नावावर केल्यानंतर लगेच माेबाइल नंबर अपडेट करावा, बॅकलाॅगची समस्या दूर करावी, दुसऱ्या जिल्ह्यातील वाहने आधार कार्डवर हस्तांतरित करावी, बँकेचे कर्ज फेडल्यानंतर आरसी बुक द्यावे, फाॅर्म ३६ चे नियम शिथिल करावेत आदी मागण्यांचे निवेदन मैत्रेवार यांना देण्यात आले. त्यावर जाचक नियम हटवण्यात येतील, असे आश्वासन मैत्रेवार यांनी संघटनेच्या शिष्टमंडळास दिले. या वेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सय्यद वसिमाेद्दीन, सचिव सय्यद कादीर, कार्याध्यक्ष सुनील दरक, शेख सरफराज, रमेश बंग, दाऊद खान, अमर बसरावी, अफसर मणियार आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...