आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:खुनातील आरोपीला पॅरोलवर सोडण्यासाठी 2 लाखांची मागणी; जेलर, कर्मचारी निलंबित

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मोबाइलद्वारे कैद्याच्या मुलाला 2 वेळेस कॉल केले

हर्सूल मध्यवर्ती कारागृहात खुनाच्या गुन्ह्यातील कैद्याला कोरोना काळात पॅरोलवर सोडण्यासाठी २ लाखांची मागणी केल्याचा प्रकार समोर आला होता. कैद्याच्या मुलाने याची कॉल रेकॉर्डिंग कारागृह प्रशासनाला सादर केल्यानंतर कारागृह अधीक्षक हिरालाल जाधव यांची उचलबांगडी, २ जेलरसह चौघांना निलंबित केले आहे.

गंभीर गुन्हेगार वगळता ७ वर्षांपेक्षा कमी शिक्षा झालेल्या कैद्यांना ४५ दिवसांच्या पॅराेलवर सोडण्याचा निर्णय शासनाने घेतला. तरीही हर्सूल कारागृहात खुनाच्या आराेपीला पॅरोलवर सोडण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी २ लाख रुपये मागितले. जेलर व कर्मचाऱ्यांनी कारागृहात मोबाइल बंदी असूनही वरिष्ठांच्या सांगण्यानुसार लॉकरमधून अधिकाऱ्याचा मोबाइल घेतला. तो एका दुसऱ्या अट्टल गुन्हेगाराला देऊन त्याला बिडकीनच्या खुनातील आरोपीच्या मुलाला कॉल करण्यास सांगितले. गुन्हेगाराने कॉल करून वडिलांना पॅरोलवर सोडण्यासाठी दोन लाख रुपये घेऊन ये, तत्काळ पॅरोल मंजूर होईल, असे सांगितले. मात्र, ती कॉल रेकॉर्डिंगच मुलाने कारागृहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर सादर केली.

मोबाइलद्वारे कैद्याच्या मुलाला २ वेळेस कॉल केले
कैद्याच्या मुलाला २ वेळेस कॉल केले. अधीक्षक हिरालाल जाधव यांच्यासह जेलर प्रशांत उखळे, प्रदीप रेहपाडे व कर्मचारी बाळू चव्हाण, राजू सत्तावन हे दाेषी आढळले. जेलर व कर्मचारी निलंबित, तर जाधव यांची पुणे तुरुंगाधिकारी प्रशिक्षण महाविद्यालयात बदली केली.