आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:भाग्याेदयनगरात पथदिवे सुरू करण्याची मागणी

औरंगाबाद7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा परिसर चाटे स्कूल व उमरीकर लाॅन्सजवळील भाग्याेदयनगरात पथदिव्यांभावी नागरिकांचे हाल हाेत आहेत. परिसरातून रात्रीच्या वेळी वृद्ध व महिलांना ये-जा करणे अडचणाीचे ठरत आहे. भाग्याेदयनगर येथे २०० ते २५० घरांची वसाहत आहे. येथे पथदिवे लावण्यात यावे, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांनी केली आहे.यासंदर्भात मनपाला वेळोवेळी निवेदनेही सादर करण्यात आली. परंतु याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यामुळे परिसरातीलमहापालिका प्रशासनाविराेधात परिसरात संतापाचा सूर उमटला आहे.

महापालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी भाग्याेदयनगर विकास समितीचे कुणाल इप्पर, प्रकाश राऊत, राजेंद्र जाेशी, अमर पाेरवाल, विष्णू तुपे, उमेश भाले आदींसह नागरिकांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...