आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदेश:सिडकोकडून पाडकामाचा प्रयत्न; खंडपीठाचा ब्रेक

औरंगाबाद3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महानगरपालिकेने रोजाबाग येथील लाला कांबळे यांना प्लॉटवर बांधकाम करण्याची परवानगी दिली असताना सिडको प्रशासनाने बांधकाम पाडण्यासाठी जेसीबी व पोलिस बंदोबस्त घेतला. याविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात तातडीची याचिका दाखल करण्यात आली. न्या. रवींद्र घुगे व न्या. संजय देशमुख यांनी सिडकोच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बांधकाम पाडू नये, असे आदेश दिले.

संबंधित मालमत्ताधारक बांधकाम करीत असेल तर त्याचे बांधकाम थांबवू नये असेही आदेश दिले आहेत. लाला कांबळेमार्फत जीपीए शेख अब्दुल जब्बार शेख सत्तार सिटी सर्व्हे नं. ११४८९|१ मधील प्लॉट क्रमांक ५ आणि ७ गीतानगरचे मालक आहेत. सदरचा प्लॉट त्यांना किनो सहकारी संस्थेने १९८९ मध्ये दिला होता. जागामालकाने अॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्या वतीने खंडपीठात धाव घेतली. प्रकरणावर तातडीची सुनावणी घेण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...