आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 हजारांच्या नोटांचा टक्का घटला:2000 रुपयांची नोटमंदी, 6 वर्षांमध्ये 2 हजारांच्या नोटांची संख्या 51% घटली

महेश जोशी | औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

2016 च्या नोटाबंदीनंतर आलेल्या 2000 रुपयांच्या नोटांची संख्या दरवर्षी घटत चालली आहे. 2016 च्या तुलनेत 2022 मध्ये 2 हजारांच्या नोटांची संख्या 51.41%, तर त्यांचे मूल्य 72.50 टक्क्यांनी घटले आहे. तथापि, चलनातील एकूण नोटांपैकी 87% नोटा 500 व 2000 रुपयांच्याच आहेत. डिजिटल अर्थव्यवस्थेला बळ देणे हा नोटाबंदीचा उद्देश असताना दरवर्षी नोटांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदीची घोषणा केली होती. काळ्या पैशांविरुद्ध लढा देण्यासाठी मोठ्या किमतीच्या नोटा चलनातून बाद होणे आवश्यक होते. मात्र, हजार रुपयांची नोट बंद करून 2 हजार रुपयांची नोट आणली. या नोटेची चलनातील संख्या आणि वाटा घटत चालल्याचे रिझर्व्ह बँँकेच्या 2021-22 च्या वार्षिक अहवाला नमूद आहे.

87% वाटा मोठ्या नोटांचा
- 2, 5, 10, 20, 50 व 100 रुपयांच्या 67.6% नोटा चलनात असून त्यांचे मूल्य चलनातील सर्व नोटांपैकी अवघे 12.2% आहे. 2020 मध्ये 500 च्या 25.4%, 2021 मध्ये 31.1%, तर 2022 मध्ये 34.9% नोटा चलनात आल्या. त्यांची किंमत एकूण चलनातील नोटांच्या अनुक्रमे 60.8%, 68.4% आणि 73.3% आहे. - चलनात 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांचे प्रमाण 36.5% असून त्यांचे मूल्य 87.1% आहे. 2022 मध्ये 500 पाठोपाठ 10 रुपयांच्या सर्वाधिक 2 लाख 78,046 लाख (21.3%) नोटा असून त्यांचे मूल्य 27,805 कोटी आहे.2021 च्या तुलनेत 200रुपयांच्या नोटांची संख्या 0.1 % घटली.

अशी होत गेली 2 हजारांच्या नोटांत घट :

2017 मध्ये 2 हजारांच्या 6 लाख 57,100 कोटी रु. च्या 32,850 लाख नोटा (3.3%) चलनात होत्या. 2018 मध्ये 2 हजारांच्या 33,630 लाख नोटा (6 लाख 72,600 कोटी रु.) चलनात होत्या. 2019 मध्ये 32,910 लाख (3%) तर 2020 मध्ये 27,398 लाख (2.4%), 2021 मध्ये 24,510 लाख (1.6%), 2022 मध्ये 21,420 लाख (1.6%) नोटा चलनात आल्या.

बातम्या आणखी आहेत...