आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संविधानाची उद्देशिका:ख्रिस्ती समाजास लक्ष्य केले जात असल्याच्या विरोधात मूकमोर्चा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ख्रिस्ती समाज शांतताप्रिय व संविधानाला मानणारा असताना त्यास लक्ष्य केले जात आहे. प्रार्थनास्थळांवर हल्ले सुरू आहेत. याचा निषेध करण्यासाठी ख्रिस्ती कृती समितीने शुक्रवारी दुपारी विभागीय आयुक्तालयावर मूक मोर्चा काढला.औरंगाबाद शहरासह जिल्हा व मराठवाड्यातून आलेले ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांनी हातात तिरंगा, शांततेचे प्रतीक असलेले पांढरे ध्वज आणि संविधानाची उद्देशिका घेत हा मूक मोर्चा काढला. शासनाचे प्रतिनिधी असलेल्या विभागीय आयुक्तांना या मागण्यांचे निवेदन देण्यात आले व राष्ट्रगीताने याचा समारोप करण्यात आला.

शुक्रवारी सकाळी आमखास येथून हा मूक मोर्चा निघाला. लेबर कॉलनीमार्गे विभागीय आयुक्त कार्यालयावर गेले. तेथे मोर्चातील शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांना निवेदन दिले. खिस्ती समाजाने कोणत्याही जातीचा किंवा धर्माचा द्वेष केला नाही किंवा कोणत्याही धर्माची हेटाळणी केली नाही. दया आणि करुणा हा या समाजाचा पाया आहे तरीही या अशा शांतताप्रिय समाजाला टार्गेट करून त्यांच्यावर करण्यात येणाऱ्या हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. यामध्ये बिशप एम. यू. कसाब, बिशप अंबरोझ रिबेलो आणि बिशप आर. बी. गायकवाड यांच्यासह सर्व चर्चचे धर्मगुरू सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...