आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रमाई घरकुलासाठी आंदोलन:योजनेची रक्कम वाढवून देण्याची मागणी; दलित पँथरची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

रमाई घरकुल योजनेच्या रक्कमेत वाढ करावी, दलितांवरील अत्याचार थांबविण्यात यावे या व इतर मागण्यासाठी भारतीय दलित पँथरच्या वतीने पॅंथर नेते लक्ष्मण भुतकर यांच्या नेतृत्वाखाली 27 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. रमाई घरकुल योजनेची रक्कम वाढवून देण्यात यावी. दलितांवर अन्याय अत्याचार करणाऱ्या कठोर कारवाई करण्यात यावी आदी मागण्यासाठी निदर्शने करण्यात आली.

आंदोलकांच्या मागण्या

आंदोलनकर्त्यांनी मागणी केली की, मराठवाड्यातील भूमिहीनांना गायरान जमिनीचे सातबाराचे उतारे देण्यात यावे, स्वस्त धान्य दुकानदारांची मनमानी मनमानी थांबवण्यात यावी, सदस्या प्रमाणे अन्नधान्याचे वाटप करण्यात यावे, जिल्हा परिषदेचे परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विजयकुमार डहाळे व शाखा अभियंता शीतल कुमार कंठाळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, धरणग्रस्त शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात यावे व त्यांच्या मुलांना शासन सेवेत सामावून घ्यावे बँक व्यवस्थापकाचे मनमानी थांबवण्यात यावी व विविध कर्जप्रकरणे एका महिन्यात निकाली काढावे. शहरातील महापुरुषांच्या पुतळा समोरील व शाळा महाविद्यालय समोरील देशी दारूचे दुकाने व बियर बार त्वरित हटविण्यात यावे. आदी मागण्यासाठी निदर्शने करण्यात आली.

जोरदार घोषणाबाजी

यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन दिले. या वेळी पॅंथर नेते लक्ष्मण भुतकर, प्रकाश पवार, दिलीप पवार, दशरथ कांबळे, ॲड. सतीश राऊत, गिताबाई मस्के, अमोल भुतकर, संजय सरोदे, अशोक मगरे, समाधान कस्तुरे, पार्वतीबाई घोरपडे, कावेरीबाई ससाने, शिलाबाई मोकळे, काळुबाई खरात, मंदाबाई साळवे, रुक्मिणीबाई आगळे, मंगलबाई रत्नपारखे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.