आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धरणे आंदोलन:शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी हिंगोलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

हिंगोली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी हिंगोलीत अखील भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने सोमवारी ता. 27 जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी आमदार संतोष टारफे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, आर. आर. कोर्डे, बाबुराव गाडे, टी. के. टापरे, शेख खलील बेलदार, बापुराव बांगर, जिल्हा परिषद सदस्य डॉ. सतीष पाचपुते, केशव नाईक, विलास गोरे, आबेदअली जहागिरदार, गोपाल ढोणे, किशनराव काशीदे, मनोहर जाधव यांच्यासह विविध राजकिय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

अखील भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने यावेळी जिल्हा प्रशासनाकडे निवेदन दिले. निवेदनात शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करावेत, शेतीमालास किफायतशीर दिडपट भाव देऊन हमी भावाचा कायदा करावा, वीज विधेयक 2020 मागे घ्यावे, पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर तसेच जीवनावश्यक वस्तुंची भाववाढ मागे घ्यावी, सर्व गरजूंना अन्न सुरक्षा योजनेचे कार्ड द्यावे, कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये द्यावेत यासह इतर मागण्या नमुद करण्यात आल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...