आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा आयुक्तांना मागण्यांचे निवेदन:बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी मनपासमोर निदर्शने

छत्रपती संभाजीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आंबेडकरनगर चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, आंबेडकरनगर वाॅर्ड क्रमांक ३२ अंतर्गत येणारा चिकलठाणा एमआयडीसीमधील खराब झालेला रस्ता त्वरित करावा, यांसह विविध मागण्यांसाठी माजी नगरसेविका भारती महेंद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली ३ मार्च रोजी मनपा मुख्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. त्यानंतर शिष्टमंडळाने मनपा आयुक्तांना मागण्यांचे निवेदन दिले.

जळगाव रोडवरील आंबेडकरनगर येथील चौकात अनेक वर्षांपासून मागणी असलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा त्वरित उभारण्यात यावा, आंबेडकरनगर वाॅर्ड क्रमांक ३२ अंतर्गत चिकलठाणा एमआयडीसीतील ग्रीव्हज कॉटन कंपनीकडे जाणारा रस्ता त्वरित करण्यात यावा, या परिसरात ३० खाटांचे रुग्णालय तयार करण्यात यावे, या मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली. या वेळी माजी नगरसेविका भारती सोनवणे, लक्ष्मण भुतकर, रामदास गोरडे, महेंद्र सोनवणे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...