आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Demu Shattle Train Auranagabad | Demo Shuttle Without Reservation Starting From Monday; It Will Run From Jalna To Shirdi On Monday, Tuesday And Thursday

सोमवारपासून श्रीगणेशा:आरक्षण नसलेली डेमू शटल सुरू; आठवड्यातून 3 दिवस जालना ते शिर्डी धावणार

औरंगाबाद18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना ते शिर्डी तीन दिवस आणि जालना ते नगरसोल तीन दिवस डेमू शटल ही पूर्णत: विना आरक्षण असलेली रेल्वे सोमवार 20 जूनपासून धावणार आहे. कोरोनानंतर बंद करण्यात आलेली विना आरक्षण असलेली गाडी प्रवाशांच्या सुविधेसाठी पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवार, मंगळवार आणि गुरुवार जालना ते शिर्डी धावणारी डेमू जालना येथून सकाळी 6.15 वाजता निघेल. औरंगाबादला सकाळी 7.05 वाजता पोहचून 7.10 वाजता पुढच्या प्रवासाला निघेल. शिर्डी येथे 11.50 वाजता पोहचून परतीच्या प्रवासाला दुपारी 1.40 वाजता निघेल. औरंगाबादला सायंकाळी 7.30 वाजता पोहचेल आणि जालना येथे रात्री 9.10 वाजता पोहोचेल. डेमू बुधवार, शुक्रवार आणि रविवारी नगरसोल स्थानकापर्यंतच धावेल. नगरसोलहून सायंकाळी 5 वाजता निघेल.

सवलत अद्याप सुरू नाही

रेल्वेत विविध घटकांसाठीच्या प्रवासाच्या सवलती अद्याप सुरू झाल्या नाहीत. समाज माध्यमांवर संबंधित सवलती 1 जुलै पासून सुरू करण्यात येत असल्याची पोस्ट फिरत आहे. रेल्वेच्या सूत्रांनी मात्र अद्याप कुठलाही निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. केवळ अपंगांसाठीची सवलत सुरू असल्याचे सांगण्यात आले. रेल्वेत 53 सवलती विविध घटकांना दिल्या जातात. कोरोनामुळे सदर सवलती रद्द करण्यात आलेल्या आहेत. अद्याप रेल्वे प्रशासनाच्या वतीने संबंधित सवलती सुरू केल्या नाहीत. केवळ अपंगांसाठीच्या प्रवास भाड्यात सवलत देण्यात आलेली आहे.

बातम्या आणखी आहेत...