आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कन्नडमध्ये डेंग्युने घेतला तरुणाचा बळी:नगरपरिषदेने डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कन्नड शहरातील हिवरखेडा रोड व गजानन काँलनी येथील अठरा वर्षीय मुलाचा डेंग्यूने सोमवारी पहाटे मृत्यू झाला.

दर्शन गोकुळ राठोड (18) असे या मुलाचे नाव आहे. तो गोकुळ राठोड यांचा एकुलता मुलगा होता. घरात गणेश उत्सव सुरू असताना दर्शनला डेंगूची लागण झाली. कुटुंबियांनी त्याच्यावर कन्नड शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार केले. मात्र, प्रकृती अधिक खालावत असल्याने त्यांनी त्याला औरंगाबाद येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र किडनी, लिव्हर आणि ईतर अवयवांवर डेंग्यूचा मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम झाला होता. त्यामुळे रक्तदाब, मधुमेह अधिक वाढल्यामुळे त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते पण सोमवारी पहाटे दर्शनचा मृत्यू झाला.

दर्शनच्या मृत्यूची बाब समजताच कुटुंबायावर दुःखाचा डोंगर कोसळला. दर्शन अभ्यासात हुशार आणि गुणी मुलगा होता. त्याच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त झाली.

नगरपरिषदेने उपाययोजना कराव्या

नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे कन्नड शहरात पसरलेल्या अस्वच्छतेमुळे डासाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळेच शहरातील गजानन कॉलनी येथील दर्शन गोकुळ राठोड याचा बळी गेला. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. नगरपरिषद आणखी किती निष्पाप लेकरांचा बळी घेणार असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे. आता त्वरित डेंग्यु प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...