आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हेमलकसा येथे झाडाखाली दवाखाना सुरू केला. सुरुवातीला एकही आदिवासी रुग्ण येत नव्हता. आदिवासींचे जीवन प्रचंड खडतर आहे. त्यांना अंधश्रद्धेतून बाहेर काढणे आवश्यक होते, त्यासाठी आम्ही त्यांची भाषा शिकलो. दोन रुग्णांना आम्ही उपचार करून बरे, केल्यानंतर आदिवासींचा विश्वास आमच्यावर बसला. बाबांनी आम्हाला आदिवासींचे जीवन दाखवल्यामुळे आमचे जीवन बदलून गेले. त्यामुळे आमच्या जगण्याचा गरजा कमी झाल्या. असे प्रतिपादन डॉ. प्रकाश आमटे यांनी केले. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित देवगिरी महाविद्यालय फुले-शाहू-आंबेडकर व्याख्यानमालाचे ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आले आहे. यावेळी ते बोलत होते.
या 31 व्याख्यानमालेत लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसा गडचिरोलीचे पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे 'आदिवासींचे स्थान' या विषयावर दुसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ सदस्य तथा देवगिरी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य पंडितराव हर्ष होते.
पुढे बोलताना डॉ. प्रकाश आमटे म्हणाले की, बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांची सेवा करण्याचे जेव्हा आनंदवन मधून कार्य सुरू केले. तेव्हा अनेकांनी आम्हाला वाळीत टाकले होते. पुढे हे त्यांचे काम लोकांना समजले. मला व विकासला बाबाने डॉ. बनविले. तेव्हा आम्ही त्यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. आमच्या झाडाखालच्या दवाखान्यात खाटावर टाकून आणलेला रुग्ण खाट घेऊन निघून गेल्याचा ही आम्हाला फार आनंद झाला होता. ज्यांना खायला अन्न नाही ज्यांची संस्कृती पूर्वीपासूनच श्रेष्ठ आहे. परंतु परिवर्तनाच्या प्रवाहात न आल्यामुळे ते उपेक्षित राहिले त्यांच्या उत्थानासाठी आम्ही वैद्यकीय सेवा व शिक्षण सुरू केले. अध्यक्षीय समारोप मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ सदस्य तथा देवगिरी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य पंडित हर्षे यांनी केले.
या व्याख्यानमालेसाठी डॉ. मंदाकिनी आमटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक तेजनकर, संयोजक तथा उपप्राचार्य डॉ. दिलीप खैरनार, उपप्राचार्य डॉ. अनिल आर्दड, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रो. प्रदीप सोळंके, उपप्राचार्य प्रो. सुरेश लेपाने, उपप्राचार्य प्रो. नंदकिशोर गायकवाड, महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व शहरातील प्रतिष्ठित नागरिक यांची उपस्थिती होती. ही व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी संयोजक समितीचे सदस्य डॉ. कैलास ठोंबरे, डॉ. ज्ञानेश्वर जिगे, डॉ. राहुल साळवे, श्रीमती डॉ. अर्पणा तावरे, डॉ. बाळासाहेब निर्मळ, तंत्र सहाय्यक प्रो. गिरीश दुधगावकर यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व पाहुण्यांचे परिचय उपप्राचार्य डॉ. सी एस पाटील यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.