आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक:विद्यापीठ परिसरातील विभाग 27 तर संलग्नित महाविद्यालय 9 जुलैपासून सुरु होणार

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने यंदाचे अर्थात 2022-23 या शैक्षणिक वर्षाचे संभाव्य वेळापञक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार विद्यापीठ परिसरातील विभाग 27 जूनपासून तर संलग्नित महाविद्यालय 9 जुलैपासून सुरू होणार आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे शैक्षणिक सत्रांवर मोठा परिणाम झाला होता. मात्र, आता परिस्थिती सुधारल्याने नव्या शैक्षणिक सत्रात सर्व वेळापत्रकानुसार करण्याचा प्रयत्न विद्यापीठ प्रशासनाने सुरु केला आहे.

मागील दोन वर्षांपासून कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे विद्यापीठाचे नियमितचे शैक्षणिक वेळापत्रक कोलमडले होते. परंतु, आता कोरोना विषाणुची लाट ओसरली असली तरी धोका अजूनही आहे. त्यामुळे विद्यार्थी सुरक्षा आणि शासनाच्या नियमावलीनुसार विद्यापीठ प्रशासनाने नव्या शैक्षणिक सत्राला सुरुवात करणार असल्याचे म्हटले आहे. शिवाय आता बारावीचा निकालही जाहिर झाल्यामुळे पदवी प्रवेशांनाही सुरुवात होणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे गुणपत्रक मिळाल्यावर प्रवेश प्रक्रियेला वेग येईल. सध्या महाविद्यालयांमध्ये पदवीच्या विविध अभ्यासक्रमांविषयी माहिती घेण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालक विचारणार करत असल्याचे चित्रही दिसून येत आहे. विद्यापीठ प्रशासनाने कोरोना विषाणुमुळे विस्कळीत झालेले शैक्षणिक वेळापञक दुरूस्त केले असून 2022-23 या शैक्षणिक वर्षाचे नियोजन केले आहे. प्रशासनाने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार विद्यापीठ परिसरातील सर्व विभाग 27 जूनपासून तर संलग्नित महाविद्यालय 9 जुलैपासून सुरू होणार आहेत. तर संलग्नित एकूण महाविद्यालयांची संख्या 480 आहेत.

महाविद्यालयांनी 9 जुलै ते 20 जुलै दरम्यान पदवी-पदव्युत्तर वर्गाची प्रवेश प्रक्रिया राबवायची आहे. तर 21 जुलै पासून जुलैपासून प्रत्यक्ष तासिकांना सुरूवात करावी लागणार आहे. विद्यार्थ्यांना 20 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर दरम्यान 15 दिवस सुट्या देण्यात आल्या आहे. त्यानंतर 4 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान विद्यार्थ्यांच्या सत्र परीक्षा होणार आहे. या विद्यार्थ्यांचे दुसरे सञ 1 डिसेंबरपासून सरु होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...