आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉलेज:विद्यापीठातील विभाग 27 जून, तर कॉलेज 9 जुलैपासून सुरू ; गुणपत्रक मिळाल्यानंतर प्रवेश प्रक्रियेला वेग

औरंगाबाद20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार विद्यापीठ परिसरातील विभाग २७ जून, तर संलग्नित महाविद्यालये ९ जुलैपासून सुरू होतील.बारावीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रक मिळाल्यानंतर प्रवेश प्रक्रियेला वेग येईल. विद्यापीठाने कोरोनामुळे विस्कळीत झालेले शैक्षणिक वेळापत्रक दुरुस्त केले असून २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाचे नियोजन केले आहे. प्रशासनाने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार विद्यापीठातील संलग्नित महाविद्यालयांची संख्या ४८० आहे. महाविद्यालयांनी ९ ते २० जुलैदरम्यान पदवी-पदव्युत्तर वर्गाची प्रवेश प्रक्रिया राबवायची आहे. २१ जुलैपासून प्रत्यक्ष तासिकांना सुरुवात करावी लागेल. विद्यार्थ्यांना २० ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबरदरम्यान १५ दिवस सुट्या दिल्या आहेत. त्यानंतर ४ ते ३० नोव्हेंबरदरम्यान सत्र परीक्षा होतील. दुसरे सत्र १ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. त्यानंतर परीक्षेचा कालावधी व निकालाची प्रक्रिया १ एप्रिल २०२३ ते १२ मेदरम्यान पार पडेल.

बातम्या आणखी आहेत...