आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरूवात:विद्यापीठातील विभाग 26 जून, संलग्नित महाविद्यालये 9 जुलैपासून सुरू होणार

औरंगाबाद21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार विद्यापीठ परिसरातील विभाग २७ जून, तर संलग्नित महाविद्यालये ९ जुलैपासून सुरू होतील. गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे शैक्षणिक सत्रांवर मोठा परिणाम झाला. मात्र, आता परिस्थिती सुधारल्याने नव्या शैक्षणिक सत्रात वेळापत्रकानुसार वर्ग भरवण्याचा प्रयत्न विद्यापीठाने सुरू केला आहे.

बारावीचा निकाल जाहीर झाल्यामुळे पदवी प्रवेशाला सुरुवात होणार आहे. विद्यार्थ्यांना गुणपत्रक मिळाल्यानंतर प्रवेश प्रक्रियेला वेग येईल. सध्या महाविद्यालयांत पदवीच्या विविध अभ्यासक्रमांविषयी विद्यार्थ्यांसह पालक चौकशी करत आहेत. विद्यापीठाने कोरोनामुळे विस्कळीत झालेले शैक्षणिक वेळापत्रक दुरुस्त केले असून २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाचे नियोजन केले आहे.

प्रशासनाने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार विद्यापीठातील संलग्नित महाविद्यालयांची संख्या ४८० आहे. महाविद्यालयांनी ९ ते २० जुलैदरम्यान पदवी-पदव्युत्तर वर्गाची प्रवेश प्रक्रिया राबवायची आहे. २१ जुलैपासून प्रत्यक्ष तासिकांना सुरुवात करावी लागेल. विद्यार्थ्यांना २० ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबरदरम्यान १५ दिवस सुट्या दिल्या आहेत. त्यानंतर ४ ते ३० नोव्हेंबरदरम्यान सत्र परीक्षा होतील. दुसरे सत्र १ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. त्यानंतर परीक्षेचा कालावधी व निकालाची प्रक्रिया १ एप्रिल २०२३ ते १२ मेदरम्यान पार पडेल.

बातम्या आणखी आहेत...