आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेसन्स फ्रॉम ग्रेट थिंकर्स:नैराश्य शक्य असणारे अशक्य करते

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुन्शी प्रेमचंद {श्रीमंत माणसाला सर्वत्र जो मानसन्मान मिळतो ते त्याला नव्हे, तर त्याच्या संपत्तीला मिळत असतो. {दुसऱ्यांना सुख देण्यातच वास्तविक सुख आहे. सुख ओरबाडण्यात नाही. {व्यक्तीला प्रत्येक ठिकाणी कार्यकुशलतेची गरज भासते. {खाणे आणि झोपणे याचे नाव जीवन नाही. पुढे जात राहणे यालाच जीवन म्हणतात. ही आस कायम असायला हवी. {यशात दोष मिटवण्याची एक अफाट आणि अद््भुत शक्ती असते. {अापण केलेली चूक आपल्याच हातांनी सुधारणे सर्वोत्तम. दुसऱ्यांनी सुधारण्यापेक्षा हे कितीतरी चांगले आहे. {भूतकाळ कसाही असो, त्याच्या स्मृती मात्र सुखदच असतात. {चोर केवळ दंडापासूनच वाचू इच्छित नाही तर त्याला अपमानही नको असतो. तो दंडाला फारसा घाबरत नाही, मात्र अपमान त्याला असह्य होतो. {आत्मसन्मानाची सुरक्षा आपला सर्वात पहिला धर्म आणि अधिकार आहे. {क्रोध मौन सहन करू शकत नाही. मौनापुढे क्रोधाची शक्ती कुचकामी ठरते. {अन्याय झाल्यानंतर गप्प राहणे, हे अन्याय करण्यासमानच असते. {नैराश्य शक्य असणारे अशक्य बनवते.

बातम्या आणखी आहेत...