आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीड:आठ हजाराची लाच घेताना बीडमध्ये उपअभियंता पकडला,बीड एसीबीची कारवाई

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्मशानभूमी शेडच्या बीलासाठी मागितली लाच

स्मशानभूमी शेडच्या कामाचे बील मंजूर करुन देण्यासाठी 12 हजारांची लाच मागून तडजोडीअंती 8 हजारांची रक्कम स्वीकारताना बीड जि.प.च्या उपअभियंत्यास ‘एसीबी’च्या पथकाने रंगेहाथ पकडले. शनिवारी (दि.5) सांयकाळी 7 वाजता ही कारवाई करण्यात आली.

एसीबीच्या माहितीनुसार, नामदेव रामकिसन बहिर असे रंगेहाथ पकडलेल्या उपअभियंत्याचे नाव आहे. माजलगाव तालुक्यातील एका तक्रारदार कंत्राटदाराने गतवर्षी माजलगाव तालुक्यात स्मशानभूमी शेडचे काम केले होते. या कामाचे 12 लाख रुपये बील झाले होते. हे बील मंजुरीसाठी जि.प.बांधकाम विभागाकडे आले होते. तिथे उपअभियंता नामदेव बहिर यांच्या सहीने ते बील मंजूर केले जाणार होते. कंत्राटदाराने या कामासंदर्भात उपअभियंता बहिर यांच्याकडे पाठपुरावा केला असता त्यांनी 12 हजारांची मागणी केली; केलेल्या कामाचे बील मिळवण्यासाठी अधिकार्‍याला पैसे देण्याची इच्छा नसल्याने कंत्राटदाराने बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. त्यानंतर पथकाकडून सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून तडजोडीअंती 8 हजारांची लाच स्वीकारताना उपअभियंता बहिरला त्याच्या राहत्या घरात रंगेहाथ पकडण्यात आले. एसीबीचे उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील व एसीबीच्या कर्मचार्‍यांनी ही कारवाई केली.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser