आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हिंगोली:हिंगोलील भुमिअभिलेख उपाधिक्षकावर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा, विनापरवाना गैरहजर राहणे भोवले

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली शहरातील कोवीड केअर सेंटर येथे नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केल्यानंतर त्या ठिकाणी गैरहजर राहणाऱ्या हिंगोलीच्या भुमिअभिलेख उपाधिक्षकावर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत मंगळवारी ता. ७ हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली शहरासह जिल्हाभरात कोरोनाविषाणूच्या पार्श्वभूमीवर  कोवीड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. याशिवाय जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या कोवीड सेंटरवर नोडल अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून त्या ठिकाणी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिल्या आहेत.

त्यानुसार हिंगोली येथील कोरोना केअर सेंटर येथे नोडल अधिकारी म्हणून तालूका भूमिअभिलेख कार्यालयाचे उपाधीक्षक श्रीकांत मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश त्यांच्याकडे पाठवण्यात आले. मात्र नियुक्ती झाल्यानंतर ही श्रीकांत मुंडे हे गैरहजर राहिले. या प्रकाराची चौकशी करून जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख  सुजितकुमार जाधवर यांनी आज दुपारी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यामध्ये श्रीकांत मुंडे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतरही ते विनापरवाना कर्तव्यावर गैरहजर राहिले असल्याचे नमूद केले आहे. यावरून श्रीकांत मुंडे यांच्याविरुद्ध हिंगोली शहर पोलिस ठाण्यात आपत्तीव्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक अखिल सय्यद उपनिरीक्षक मनोज पांडे पुढील तपास करीत आहेत.

0