आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदभार:जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारीपदी देशमुख

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही महिन्यांपासून छत्रपती संभाजीनगरचे कृषी अधीक्षक अधिकारी पद रिक्त होते. या रिक्त झालेल्या पदावर जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी प्रकाश रुस्तुमराव देशमुख यांची पदोन्नती केली. कृषी विभागाचे सहसचिव यांनी ५ एप्रिलला पत्र काढून ही पदोन्नती दिली. देशमुख यांनी कृषी विकास अधिकारी असताना जिल्ह्यातील बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यास तसेच शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात मोलाचे योगदान दिले. जिल्हा कृषी अधीक्षक तुकाराम मोटे यांच्या रिक्त जागी देशमुख यांची पदोन्नती झाली. तर कृषी विकास अधिकारी पदाचा तात्पुरत्या स्वरूपात दीपक गवळी यांना पदभार देण्यात आला आहे.