आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी रिसर्च:राज्यात 7 वर्षांपासून गोवंश हत्याबंदी असूनही 15 लाख गाय-बैल घटले, पशुगणनेतील आकडेवारीतील माहिती

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोवंश म्हणजे गाय, बैल आणि वळू या प्राण्यांची संख्या कमी होऊ नये म्हणून महाराष्ट्रात ४ मार्च २०१५ पासून गोवंश हत्याबंदी कायदा आणण्यात आला. पण आश्चर्याची बाब म्हणजे, गोवंश वाढण्याऐवजी कमी झाले आहेत. २०१२ च्या पशुगणनेनुसार, राज्यात १ कोटी ५४ लाख ८४,२०७ गोवंश होते. २०१९-२० दरम्यानच्या पशुगणनेत ही संख्या १ कोटी ३९ लाख ९२,३०४ वर आली आहे. म्हणजेच या काळात १४ लाख ९१,९०३ गाय-बैल कमी झाले आहेत.

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी वरदान असलेल्या गोवंशाची हत्या होऊ नये म्हणून अनेक वर्षांपासून बंदी आणण्याची मागणी होती. अखेर २६ फेब्रुवारी २०१५ पासून गोवंश बंदी कायदा मंजूर करण्यात आला होता. ४ मार्च २०१५ पासून अंमलबजावणीही सुरू झाली आहे. पण प्रत्यक्षात हा कायदा निष्प्रभ ठरल्याचे पशुगणनेतील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

इतर पशूंच्या संख्येत मात्र वाढ
हत्येवर बंदी नसलेल्या पशूंची संख्या वाढली आहे. २०१२ दरम्यान ५५ लाख ९४,३९२ म्हशी होत्या. २०१९-२० दरम्यान ९,३०० ने वाढ होऊन म्हशींची संख्या ५६ लाख ३,६९२ झाली आहे. मेंढ्यांमध्येही ९९,९४८ ची वाढ झाली आहे. बकऱ्यांची संख्या २१ लाख ६९,५७६ ने वाढ झाली आहे. २०१२ च्या नोंदीनुसार वराहांची संख्या ६५,१५१ ९५,८४९ होती. ती २०१९-२० दरम्यान वाढून १ लाख ६१ हजारवर गेली.

बातम्या आणखी आहेत...