आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिवृष्टी:60 हेक्टरवरील लागवड उद्ध्वस्त पिके दीड फूट पाण्यात, आठ वर्षांनंतर कानडगाव शिवारात मोठा पाऊस

औराळा (संतोष निकम)2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आधी दुष्काळ, आता अतिवृष्टीने नागवले

सलग ४ ते ५ वर्षांपासून कमी पर्जन्यमानाचे गाव म्हणून कन्नड तालुक्यातील कानडगाव सटीचे नाव समाेर येते. शेतकरी ५ वर्षांपासून दुष्काळाशी झगडत आहे. मात्र, यंदा मृग नक्षत्रात बऱ्यापैकी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या हाेत्या. पिके ३ फूट वाढली होती. ८ वर्षांनंतर शुक्रवारी सायंकाळी सलग दाेन तास जाेरदार पावसाने झाेडपले. ५० ते ६० हेक्टरवरील कपाशी, मका वाहून गेली. पिके पाण्याखाली गेल्याने नुकसान झाले.

शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत करा

शिवारात शुक्रवारी दोन तासांत १५० मिमी पाऊस झाल्याची शक्यता आहे. शेतात ३-४ फूट पाणी साचले आहे. दुबार पेरणीही शक्य नसल्याने हेक्टरी ५० हजारांची मदत करावी. - अप्पासाहेब नलावडे, सरपंच

आधी दुष्काळ, आता अतिवृष्टीने नागवले

गेल्या ४ वर्षांपासून दुष्काळाने आमचे अक्षरशः कंबरडे मोडले. दुकानदार उधार बियाणे देण्यास तयार नव्हता. कसेबसे हातापाया पडून बियाणे-खत आणले होते. मिरगाची लागवड असल्याने उतार चांगला झाला होता म्हणून एक दिवस आधीच खत टाकले. कपाशी चांगली येईल अशी आशा होती, पण शुक्रवारी अतिवृष्टीने २ तासांत वावरात ४ फूट पाणी तुंबले. तुम्ही सांगा दुकानदाराचे पैसे कसे द्यायचे... असे बोलत शेतकरी साहेबराव खुडे यांचे डाेळे भरून आले होते.

बातम्या आणखी आहेत...