आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंडे पॉझिटिव्ह:हृदयाशिवाय 5 दिवस श्वास घेणाऱ्या मनीषचे औरंगाबादचे प्रा. गायकेंमुळे वाचले प्राण

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देवगिरी महाविद्यालयातील तरुण प्रा. सुहास गायके यांच्या अवयवदानाने चार जणांचे प्राण वाचवले. पैकी मुंबईत ज्यांना हृदयदान केले, ते औरंगाबादच्याच एका बहुराष्ट्रीय कंपनीतील कर्मचारी आहेत. औरंगाबादेत ते अत्यवस्थ झाले होते. त्यामुळे कंपनीने त्यांना मुंबईत हलवले. डॉक्टरांंना २० दिवस जगतील अशी शाश्वती होती. पण, वेळीच हृदय मिळाले अन् यशस्वी प्रत्यारोपणही झाले. त्यामुळे त्यांना आता दिर्घायुष्य मिळाले आहे. विशेष म्हणजे, मनिषचा पाच दिवस कृत्रिम हृदयाद्वारे श्वास सुरू ठेवण्यात डॉक्टरांना यश आले होते. सर्वसाधारणपणे अवयव प्रत्यारोपण ही खर्चीक बाब असते. मध्यमवर्गीयांना तर हे आवाक्याबाहेरील आहे. पण, संस्थात्मक आर्थिक पाठबळ मिळाले तर गरीबांचेही प्राण वाचतात, हेच या उदाहरणावरुन स्पष्ट झाले.

‘देव तारी त्याला कोण मारी..’ या उक्तीचा अत्यंत चित्तथरारक अनुभव 4 जून रोजी आला. देवगिरी महाविद्यालयील प्रा. गायके ब्रेनडेड झाल्यानंतर त्यांचे अवयवदान करण्यात आले. त्यांचे हृदय मुंबईत पाठवण्यात आले. पण, या हृदयाचे रोपण मुंबईत करण्यात आले असले तरी औरंगाबादच्याच व्यक्तीचे प्राण वाचवण्यात आले आहेत. शनिवारी(4 जून) सायंकाळी मुंबईच्या रिलायन्स रुग्णालयात यशस्वी प्रत्यारोपणही झाले.

औरंगाबादेतील एका बहुराष्ट्रीय कंपनीतील 40 वर्षीय कर्मचारी मनिष (दिव्य मराठीकडे खरे नाव आहे. मात्र, अवयव प्रत्यारोपण नियमानुसार नाव छापता येत नाही. म्हणून खोटे नाव वापरत आहोत) वर्क फ्रॉम होम करत असताना त्यांना हृदय विकाराचा झटका आला होता. तात्काळ कमलनयन बजाज रुग्णलयात त्याला हलवण्यात आले. याठिकाणी डॉ. अजित भागवत यांनी त्याच्यावर उपचार केले. मात्र, संपूर्ण तपासण्या केल्यानंतर 20 दिवसांपेक्षा अधिक आयुष्य नाही, हे डॉक्टरांना स्पष्ट झाले.

दरम्यान, ‘कितीही खर्च होऊ द्या, पण त्याला वाचवा’, असा निरोप कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिला. अशावेळी हृदय प्रत्यारोपण हा शेवटचा पर्याय होता. मुंबईच्या रिलायन्स रुग्णालयातील हृदयरोग शल्यचिकीत्सा विशारद डॉ. अजय मुळे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. मनिषला एअर अॅमब्युलन्सच्मधून 27 मे रोजी मुंबईत दाखल करण्यात आले. हे सर्वसामान्याच्या आवाक्या बाहेर आहे. हृदय प्रत्यारोपणाची गरज असलेल्या रुग्णांत मनिषचे नाव नोंदण्यात आले. दरम्यान, मुंबईत 14 तासांनी मनिषचे हृदय बंद पडले. अशावेळी कृत्रिम हृदयाच्या आधारे मनिषला 5 दिवस शर्थीचे प्रयत्न करत जीवंत ठेवण्यात आले.

यानंतर हृदय प्रत्यारोपण हवे असलेल्या रुग्णांच्या यादीत त्याला सुपर अर्जंट या प्रकारात टाकण्यात आले. नेमके या दरम्यान औरंगाबादेत प्रा. गायके ब्रेनडेड झाले. अन त्यांच्या अवयवदानातील हृदय मुंबईत पाठवण्यात आले. हे हृदय मुंबईत डॉ. अजय यांनी मनिष यांच्यावर यशस्वीरित्या प्रत्यारोपित केले.

बातम्या आणखी आहेत...