आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरमहाविद्यालयीन सॉफ्टबॉल स्पर्धा:देवगिरी कॉलेजला सलग चौथ्यांदा विजेतेपद; कन्नडच्या शिवाजी कॉलेजने पटकावले उपविजेतेपद

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड येथील वैजनाथ महाविद्यालयातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत परळी वैजनाथ येथे आयोजित आंतर महाविद्यालयीन सॉफ्टबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न झाली.

स्पर्धेत देवगिरी महाविद्यालयाच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे देवगिरीने सलग चौथ्यांदा अजिंक्यपद आपल्या नावे केले. कन्नडच्या शिवाजी महाविद्यालयाने उपविजेतेपद पटकावले.

स्पर्धेतील विजेत्या संघांना वैजनाथ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. व्ही. मेश्राम यांच्या हस्ते पदक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी विविध महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ.पी. एल. कराड, पी. व्ही. बेंदसुरे, व्ही. एल. फड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रतिनिधी अभिजीत दिक्कत, निवड समिती सदस्य सचिन पगारे, डॉ.उदय डोंगरे, डॉ.संदीप जगताप, निवृत्त क्रीडा अधिकारी गोकुळ तांदळे आणि डॉ.पंढरीनाथ रोकडे आदींची उपस्थिती हाेती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा मंडळाचे सदस्य डाॅ. उदय डाेंगरे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. अंतिम सामन्यात पंच म्हणून अक्षय बिरादार, किशोर काळे, स्वप्नील गुडेकर आणि यश थोरात यांनी काम पाहिले. तसेच प्रा. सागर मगरे यांनी गुणलेखणाची जबाबदारी पार पाडली.

स्पर्धेच्या अंतिम सामन्यात देवगिरी महाविद्यालयाच्या संघाने कन्नड येथील शिवाजी महाविद्यालयाच्या संघास 12-3 होमरनांच्या फरकाने पराभूत केले. सुरुवातीला दोन्ही संघात रोमांचक सामना होईल असे वाटत होते, मात्र हा सामना एकतर्फी झाला. फायनलमध्ये अरोहित तुपारे, रोहित शेळके, सत्यम राठोड, अक्षय चव्हाण, बळीराम जगताप, आकाश राऊत आणि राजेश काळे या खेळाडूंनी उत्कृष्ट पिचिंग व हिटिंग करत आपल्या संघांसाठी चांगली कामगिरी केली.

देवगिरी महाविद्यालयाने प्रथम क्रमांक मिळवला. शिवाजी महाविद्यालयाने द्वितीय क्रमांक राखला. तसेच शिवछत्रपती महाविद्यालयाच्या संघाला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेतून अखिल भारतीय सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संभाव्य संघाची निवड करण्यात आली आहे. संघाच्या शिबिरानंतर संघाची घाेषणा करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...