आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्रदिन विशेष:स्वातंत्र्याची चैतन्यमयी पहाट मध्यकालीन भारताच्या बलाढ्य राजधानीवर; देवगिरीला 11 महिने देशाच्या राजधानीचा दर्जा

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 833 वर्षे पूर्ण झाली यादवांच्या या राजधानीला

तब्बल ८३३ वर्षे यादवांची राजधानी मानल्या जाणाऱ्या देवगिरी किल्ल्याला हिरवाईचा साज चढला अाहे. अाैरंगाबादला यंदा सुरुवातीच्या तीन महिन्यांत सर्वाधिक पावसाची नाेंद झाली. त्यामुळे हा देवगिरीचा किल्ला टाॅप टू बाॅटम हिरवाईने नटलेला दिसताे. मध्यकालीन भारताची मजबूत राजधानी मानल्या जाणाऱ्या देवगिरी किल्ल्यावर स्वातंत्र्याची पहाट अधिकच चैतन्यमय झाली.

यादव राजवटीची पहिली राजधानी

राजा भिल्लम यादवांनी स्वत:ला राष्ट्रकुटांपासून स्वतंत्र घोषित करून इ. स. ११८७ ते ११९१ या कालावधीत देवगिरी म्हणजे आजच्या दौलताबाद किल्ल्याला यादव राजवटीच्या पहिल्या राजधानीचा दर्जा दिला.

अभेद्य किल्ल्यावरून कुशल नेतृत्वाची धुरा

तुघलक याने चक्क दिल्लीवरून भारताची राजधानी दौलताबाद किल्ल्यावर आणली आणि ११ महिने भारताची राजधानी दौलताबाद ही होती. राजधानीचा माेठा बहुमान या किल्ल्याने मिळवलेला अाहे.

बातम्या आणखी आहेत...