आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्युदो:देवांश, शिवम, मिझबाला सुवर्ण

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद जिल्हा संघटनेतर्फे जिल्हा बालगट व कॅडेट ज्युदो संघ निवड चाचणी स्पर्धेत देवांश समिंद्रे, शिवम अनेराव, सांची सोनवणे, खान मिझबा हारुण खान, विराज नागरेने सुवर्णपदकावर नाव कोरले.

विजेत्यांची धुळे येथील राज्य स्पर्धेसाठी निवड झाली. स्पर्धेचे उद्घाटन अॅड. माधुरी अदवंत, डीएसओ चंद्रशेखर घुगे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी संघटनेचे सचिव अतुल बामनोदकर, विश्वास जोशी, प्रसन्न पटवर्धन, लक्ष्मीकांत खिची, भीमराज रहाणे, जीया अन्सारी, अमित साकला, अशोक जंगमे, दत्तू पवार, मनिंदर सिंग बिलवाल उपस्थित होते. खेळाडूंचे अध्यक्ष अजित मुळे, दत्ता आफळे यांनी अभिनंदन केले. बालगट मुले - देवांश समिंद्रे, निल जावळे, विराज नागरे, ऋषिकेश घुगे, सिद्धेश म्हस्के, नैन खान, हर्षवर्धन नागे, मुली - श्रावणी गायकवाड, सांची सोनवणे, मृगजा गोंडे, श्रृतकिर्ती के., रिया पाटील, भक्ती लोमटे, उन्नती राऊत, खान मिझबा हारुन खान, इन्शा रोशन शेख अहमद. कॅडेट मुली : नेहा जावळे, आर्या मुळे, किर्ती गायकवाड, उत्कर्षा करंगुले, राधा साळुंके, सुमेधा पठारे, स्वरदा बामनोदकर. मुले - शिवम अनेराव, यशराज साळुंके, एस. देवकर, ऋषिकेश पुंड, अर्थव कुलकर्णी, रत्नपारखी, धनंजय खिची, सोहम कापसे.

बातम्या आणखी आहेत...