आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र व भारतीय सेपक टकारा संघटनेच्या वतीने आयोजित ३३ व्या वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचा शुभारंभ विभागीय क्रीडा संकुल, मानकापुर नागपूर येथे महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत सोमवारी महाराष्ट्र, दिल्ली, उत्तराखंड, आसाम, तामिळनाडू संघांनी शानदार कामगिरी करत विजयी लय कायम ठेवली.
या स्पर्धेत देशभरातील 45 संघानी सहभाग नोंदवला आहे. स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सेपक टकरा फेडरेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. योगेंद्र सिंह दहिया, महासंघाचे राष्ट्रीय सचिव वीरागौडा, महाराष्ट्र सेपक टॅकराचे अध्यक्ष विपीन कामदार, सचिव डॉ. योगेंद्र पांडे, नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
सेपक टकारा खेळास प्रोत्साहन देऊ : उपमुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही :
देशात सेपक-टॅकरा या खेळाची पाळेमुळे प्रथम नागपुरातच रुजली आहेत. नागपूरमध्ये रुजलेला खेळ देशाला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देत असेल तर या खेळाचे पालकत्व घ्यायला निश्चितच आनंद होईल. या खेळाचे प्रशिक्षण, त्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन सकारात्मक आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
पोलिस व सीमासुरक्षा दलाला संधी
या खेळात आता पोलिस आणि सीमासुरक्षा दलाच्या दोन संघांना स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे या खेळाचा दर्जा उंचावला आहे. त्याचबरोबर सेपक-टकरा खेळाला नागपूरमध्ये पालकत्व देणार आहे. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना पदक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.