आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:सरकारमध्ये बोलणारेच जास्त निर्णय घेणारे कोणीच नाही, शासनाकडून मदतीबाबत टोलवा टोलवी; माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

हिंगोली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी फडणवीस आडगाव रंजेबुवा येथे आले होते.

राज्य सरकारमध्ये बोलणारेच जास्त झालेत, प्रत्येक जण माईक घेऊन बोलतात पण निर्णय घेणारे नकोणीच नाही, शेतकऱ्यांच्या मदतीबाबत टोलवाटोलवी होत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी ता. २१ आडगावरंजेबुवा (ता. वसमत) येथे केला आहे.

हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी फडणवीस आडगाव रंजेबुवा येथे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजीमंत्री पंकजा मुंडे, संभाजी पाटील निलंगेकर, माजी आमदार रामराव वडकुते, माजी आमदार गजानन घुगे यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना फडणवीस म्हणाले की, हिंगोली जिल्हयात झालेले नुकसान मन हेलावून टाकणारे आहे. सर्वच पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. शेतकरी अडचणीत असतांना शासनाकडून कुठल्याही प्रकारच्या मदतीबाबत निर्णय घेतला जात नाही. सरकारमध्ये फक्त बोलणारेच जास्त आहेत पण निर्णय घेणारा कोणीच नाही. सरकारला शेतकऱ्यांच्या नुकसानीचे गांभीर्य नाही. केवळ टिंगळ टवाळी, वेळकाढूपणा व डायलॉगबाजी सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा आक्रोश समजून त्यांच्या मदतीची घोषणा केली पाहिजे असे त्यांनी सांगितले.

जिल्हयात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्यानंतरही बँकांकडून कर्ज वसुली सुरु असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या. यावर बोलतांना फडणवीस म्हणाले की, अतिवृष्टी भागात कर्ज वसुलीसाठी कोणत्याही बँकांनी जाऊ नये असा आदेश शासनाने तातडीने काढावा. आता सरकारने जागे होऊन तसेच बोलघेवडेपणा सोडून शेतकऱ्यांना मदत करावी अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

असोला येथील शेतकऱ्याने हंबरडा फोडला
औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार शिवारात नुकसानीची पाहणी करतांना हळद उत्पादक शेतकरी उत्तम ढोबळे यांनी हंबरडाच फोडला. दागिने विक्री करून पेरणी केली आता पावसामुळे नुकसान झाले. शासनाकडून मदतीचा निर्णय होत नसल्याने जगायचं कसे असा सवाल करीत हंबरडा फोडला. यावेळी उपस्थितांनी शेतकऱ्यांना धिर दिला. शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी तसेच पिकविमा देण्यासाठी शासनाला भाग पाडू असे आश्‍वासन माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

बातम्या आणखी आहेत...