आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवेंद्र बुद्धीबळाचे राजे:दानवे म्हणाले- जुना सोडा आता विरोधकांना हरवण्यासाठी नवा डाव, नवी खेळी

औरंगाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधान परिषदेत भारतीय जनता पक्षाने 5 उमेदवार निवडून आणले. या शतरंजचे बादशहा देवेंद्र फडणवीस आहेत. उत्तम खेळी करत त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला हरवले. आता तोच डाव पुन्हा खेळणार नाही. एकनाथ खडसे आमचे टार्गेट नाही तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या आघाडीला हरवणे हा आमचा उद्देश आहे, असे मत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले.

गुरुवारी( ता. 16) विभागीय आयुक्त कार्यालयात रावासाहेब दानवे आले होते. त्यांनी दुपारी दोनच्या सुमारास विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांची भेट घेतली. बंद खोलीत 30 ते 40 मिनीटे चर्चा केल्यानंतर ते बाहेर आले. यावेळी आयुक्तालायात सुरु असलेल्या गण आणि गटाच्या सुनावणीत हस्तक्षेप करण्यासाठी आलेलो नाही. कार्यकर्ते त्यांचे काम करत आहेत. सुनावणीत मी हस्तक्षेप करणार नाही, असे त्यांनी सांगितले.

विधानपरिषदेच्या मुद्यावर छेडले असता दानवे म्हणाले, शतरंजचे बादशहा देवेंद्र आहेत. त्यांनी खेळी खेळली आणि तिघा पक्षांना धूळ चारली आहे. आता काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला आमचा डाव माहिती झाला आहे. त्यामुळे यापुढे आम्ही तीच खेळी खेेळणार नाही, नवा डाव टाकू. पुन्हा उमेदवार निवडून आणू, असा दावा त्यांनी केला.

खडसेला विरोध नाही, आघाडीला हरवायचेय

एकनाथ खडसे यांना उमेदवारी दिली नाही तर आम्ही निवडणूक बिनविरोध करु असे भाजपचे धोरण होते का? या प्रश्नाचे उत्तर देताना दानवे म्हणाले, असे काहीही नाही. आमचा कोणाच्याही नावाला विरोध नाही. आघाडीला हरवायचे आहे.

पंकजा प्रतिसाद देणार नाहीत

पंकजा मुंढे यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केल्यास आम्ही पाठींबा देऊ, या खासदार इम्तियाज जलील यांच्या वक्तव्या विषयी विचारल्यावर दानवे म्हणाले, राजकारणात दुसऱ्यात खोडा घालण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करतो. पंकजाताई काही इम्तियाज यांना प्रतिसाद देणार नाहीत. त्या ज्येष्ठ आणि सूज्ञ नेत्या आहेत, असेही ते म्हणाले.

गण-गटाच्या राजकारणात हस्तक्षेप नसल्याचा आव

विभागीय आयुक्त कार्यालयात औरंगाबाद जिल्ह्यातील विविध जिल्हा परिषद -पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी प्रशासनाने तयार केलेल्या गण गटांचा प्रारुप आराखड्यावर 158 आक्षेप व हरकती आल्या होत्या. यातील सर्वाधिक 84 आक्षेप औरंगाबाद तालुक्यातील होते. त्यामुळे या सुनावणी प्रसंगी आलेल्या दानवेंना यामध्ये हस्तक्षेप करण्यासाठी यावे लागले अशीच चर्चा आयुक्तालयात रंगली.

बातम्या आणखी आहेत...