आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजदरबार पाहून भारावले:क्षेत्र कचनेर येथील तपकल्याणक सोहळ्यात भक्तांचे डोळे पाणावले

औरंगाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कचनेर येथील चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन क्षेत्र येथील पंचकल्याणक महोत्सवात राजदरबार उभारण्यात आला होता. हे सादरीकरण पाहून भाविकांचे डोळे पाणावले होते. आचार्य सौभाग्यसागर महाराजांच्या मार्गदर्शनात सोहळ्याचा तिसरा दिवस साजरा झाला. या वेळी शांतिधारा करण्याचा मान दिल्लीचे मनीष जैन, वैशाली दिवाकर साहुजी, रोशनी नवींद्र सेठी, नीलिमा सतीश ठोले, दक्ष सेठी यांना मिळाला. भगवंताचा पाळणा हलवण्याचा मान तृप्तीराणी पाटणी यांना मिळाला. महोत्सव यशस्वी करण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक सुरेश कासलीवाल, उपाध्यक्ष हेमंत बाकलीवाल, सचिव विनोद लोहाडे, सहसचिव मुकेश कासलीवाल यांनी परिश्रम केले.

बातम्या आणखी आहेत...