आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॅली:शहरातून पहिल्यांदाच आज निघणार धम्मध्वज रॅली

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विश्व बौद्ध धम्मध्वज ८ जानेवारीला साजरा करण्यात येतो. यंदा औरंगाबादेत पहिल्यांदाच हा दिवस साजरा केला जाणार आहे. यासाठी पाच हजार रुपयांच्या खर्चातून ४ बाय १०० फुटांचा धम्मध्वज तयार करण्यात आला आहे.

मिलिंदनगर नागसेनवन स्टुडंट्स वेल्फेअर असोसिएशन व उपासकांतर्फे रविवारी सकाळी ११ वाजता विद्यापीठ गेटपासून ते बुद्धलेणीपर्यंत १०० फूट लांब धम्मध्वजासह रॅली काढण्यात येणार आहे. आयोजक सचिन निकम यांनी सांगितले, आतापर्यंत उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेशासह विदेशात धम्मध्वज दिन साजरा करण्यात येत होता. यंदा पहिल्यांदाच औरंगाबादेत कार्यक्रम होत आहे.

बातम्या आणखी आहेत...