आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय भेट:धनंजय मुंडे आणि रावसाहेब दानवे यांची भोकरदन येथे भेट, 2 तास बंद दरवाजाआड चर्चा

जालना2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • आमदार अमरसिह पंडित व आमदार संतोष दानवे यांचीही उपस्थिती

महेश देशपांडे

महाराष्ट्र दिनी भोकरदन येथे ,केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची राष्ट्रवादी नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंढे यांनी भेट घेतली. मराठवाड्याच्या या दोन दिग्गज नेत्यांनी बंद दरवाजा आड झालेल्या बैठकीत दोन तास राजकारणासह सर्व विषयावर चर्चा केली. यावेळी आमदार अमरसिंह पंडित  आणि आमदार संतोष दानवे हेही उपस्थित होते.

बैठकीनंतर दोन्ही नेत्यांशी संपर्क साधला असता ही सदिच्छा भेट होती असे त्यांनी सांगितले.

राज्यामध्ये FCI च्या वतीने सुरू असलेल्या हरभरा व तुर खरेदी केंद्र तसेच CCI च्यावतीने सुरू असलेल्या कापूस खरेदी केंद्रा संदर्भात बीड जिल्ह्यात निर्माण झालेल्या समस्या सोडविण्यासाठी मी व धनंजय मुंडे यांनी केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री  रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन चर्चा केली. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कापूस, हरभरा, तूर, खरेदीकेंद्र संदर्भातिल अडचणी दूर करून लवकरच खरेदी सुरू करण्यात येईल असे रावसाहेब दानवे यांनी आम्हाला सांगितले आहे अशी माहिती, आमदारअमरसिंह पंडित यांनी दिली.

1 मे महाराष्ट्र दिनी दुपारी एक वाजता मंत्री धनंजय मुंढे आमदार अमरसिंह पंडीत भोकरदनला आले. त्यांचे रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी स्वागत ही झाले. येथेच्छ भोजन झाल्यावर दोन्ही नेते व आमदार यांची दानवे यांच्या निवासस्थानच्या जलतरण कक्षात बंद दरवाज्या आड 2 तास विषेश चर्चा झाली. दुपारी साडेतीन वाजे दरम्यान धनंजय मुंडे बीडकडे रवाना झाले.

निवडणूक जाहीर आणि दानवे-मुंडे भेट 

सध्या राज्यातील महाविकास आघाडी सरकार व केंद्रातील मोदी सरकार यांच्यांतील संबंध फारसे चांगले नाहीत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या राज्यपाल नियुक्त सदस्यपदाला भाजपने केलेला विरोध, त्यावरून राज्यपालांवर झालेली टिका याची चांगलीच चर्चा राज्यात झाली होती. हा वाद जास्त वाढण्याच्या आतच  निवडणूक आयोगाने राज्यातील विधान परिषदेच्या ९ जांगावर निवडणूक घेण्याला परवानगी दिली आहे. भाजपच्या कोट्यातून तीन सदस्य नव्याने निवडूण दिले जाणार आहेत.

या पैकी मराठवाड्यातून माजी मंत्री पंकजा मुंडे यांना भाजपकडून विधान परिषदेवर पाठवले जाण्याची दाट शक्यता आहे. विधान परिषदेची निवडणूक जाहीर होणे आणि नेमक त्याच दिवशी धनंजय मुंडे भोकरदनमध्ये रावसाहेब दानवे यांच्या भेटीला येणे हा काही निव्वळ योगायोग असेल असे नाही. 

या तिघांमध्ये काय चर्चा झाली हे सद्या गुलदस्त्यातच आहे. परळी विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांचा त्यांचे चुलत बंधू धनंजय मुंडे यांनी पराभव केला. त्यानंतर पंकजा मुंडे आणि त्यांच्या समर्थकांकडून आपल्या पराभवाला भाजपच्या काही नेत्यांकडूनच रसद पुरवली गेल्याचा आरोप करण्यात आला होता.

लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतरची दानवे- धनंजय मुंडे यांची ही पहिली भेट महत्वाची समजली जाते. विधान परिषदेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच, कपूस हरभरा तुरीचा खरेदीचा  प्रश्न घेऊन थेट दानवे यांचा बंगला गाठणाऱ्या धनंजय मुंडे यांच्या या राजकीय खेळीकडे सर्च राजकीय निरीक्षक व  नेत्यांनी भुवया उंचावून बघितले आहे . ही भेट सदिच्छा आणि बीड धजिल्ह्यातील खरेदीतील त्रुटींवर चर्चा करून ती सोडवण्यासाठी होती असे सांगण्यात आले , पण या भेटीमागे वेगळेच मराठवाड्याच्या दोन दिगग्ज नेत्यांचे वेगळेच राजकारण  सुरू झाले आहे अशी चर्चा सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...