आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत धनगर समाजाचा आक्रोश मेळावा:आरक्षणासह समाजाच्या विकासासाठी 1 हजार कोटींचा निधी देण्याची मागणी

प्रतिनिधी|औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी धनगर समाजासाठी एक हजार कोटी रुपयांची देण्याची घोषणा केली होती. त्याबाबतचा अध्यादेश देखील काढण्यात आला होता. मात्र गेल्या अडीच वर्षांत त्याची कुठलीही अंमलबजावणी झाली नाही. राज्यात नवीन सरकार आल्यानंतरदेखील ही मदत समाजाला मिळालेली नाही. त्यामुळे धनगर समाजाच्या वतीने 6 नोव्हेंबरला मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती माजी खासदार डॉक्टर विकास महात्मे यांनी दिली. ते औरंगाबादमधील पत्रकार भवनामध्ये आयोजित पत्रकार परिषद बोलत होते

येत्या 6 नोव्हेंबर रोजी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी औरंगाबादेत धनगर समाज आक्रोश महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन धनगर समाज संघर्ष समितीने केले आहे. हा मेळावा रविवारी (ता. 6) औरंगाबादेतील हर्सूल (हरसिध्दी माता मंदिर मैदान) येथे होईल. धनगर समाज संघर्ष समिती आणि समस्त धनगर समाजातर्फे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती माजी खासदार डॉ. विकास महात्मे यांनी दिली.

'र' चा 'ड' झाला

विकास महात्मे म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाजाच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. त्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यास व धनगर समाजाच्या एस.टी.आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी हा सर्वपक्षीय मेळावा आहे. धनगर समाजाला भारतीय राज्य घटनेने आरक्षण दिले आहे. मात्र, राज्यात धनगर समाजाचा उल्लेख धनगड झाला आहे. 'र' चा 'ड' झाल्याने मोठा समाज आरक्षणापासून वंचित आह. हा प्रश्न निकाली काढावा.

तीन हजार कोटी द्या

तत्कालीन भाजपा सरकारने धनगर समाजाच्या विकासासाठी एक हजार कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. दरवर्षी प्रमाणे तीन वर्षांचा एकत्र निधी मिळावा, धनगरांना आदिवासींप्रमाणे मंजूर केलेल्या योजनांची अमलबजावणी करावी, धनगर समाजाच्या मुलांना शिष्यवृत्ती तसेच घरकुल योजनेचा लाभ मिळावा, मेंढपाळ बांधवांना चराईसाठी पास मिळावे, अशा अनेक मागण्या या आक्रोश मेळाव्यात मांडण्यात येणार आहेत. धनगर समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी समाजातील सर्व धनगर नेते एकत्र येणार असून या मेळाव्यास समाज बांध मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन धनगर समाज संघर्ष समितीचे संस्थापक माजी खासदार विकास महात्मे, प्रदेश अध्यक्ष बापुसाहेब शिंदे तसेच औरंगाबाद जिल्हा कार्यकारिणी रंगनाथ राठोड, अरुण रोडगे, बाळासाहेब जानराव, यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...