आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनगर समाजाच्या मेळाव्यात टीकेचे बाण:सावे, भुमरेंच्या टीकेवर दानवेंचा सवाल म्हणाले- 'मविआ'त मंत्री असताना भुमरेंचे काम काय?

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धनगर समाजाला एक हजार कोटी रुपये देण्याच्याबाबत अध्यादेश देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना काढला होता. मात्र त्यानंतर युती सरकार गेले. या मंत्री अतुल सावेंच्या वक्तव्यावरशिवसेनेचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी कापत फडणवीस यांनी धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात घोषणा केली, पण धनगर समाजाला आरक्षण मिळालेच नाही असा प्रतिहल्ला केला.

धनगर समाजाच्या आक्रोश मेळाव्याच्या निमित्ताने​​​ केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड सहकार मंत्री अतुल सावे, रोहयोमंत्री तथा पालकमंत्री संदिपान भुमरे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांची उपस्थिती होती. माजी खासदार डॉक्टर विकास महात्मे यांच्या नेतृत्वाखाली या धनगर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. हर्सूलच्या हरसिद्धी मैदानावर रविवारी पाच तास हा आक्रोश मेळावा पार पडला. यासाठी महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात धनगर समाज बांधव उपस्थित होते.

मविआने निधी दिला नाही- सावे

धनगर समाजाला एक हजार कोटी रुपये देण्याच्याबाबत अध्यादेश देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना काढला होता. मात्र त्यानंतर युती सरकार गेले. महविकास आघाडी सरकारच्या काळात हा निधी मिळाला नाही. मात्र आता माझ्या ओबीसी खात्याकडून अनेक निर्णय घेण्यात येत असून हा एक हजार कोटी रुपयांचा निधी धनगर समाजाला मिळून देणार असल्याची आश्वासन ओबीसी तसेच सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिले. ते धनगर समाजातर्फे आयोजित आक्रोश मेळाव्यात बोलत होते. यावेळी सर्वच मंत्र्यांनी धनगर समाजाच्या प्रलबित प्रश्न सोडवण्या बाबत आश्वासन दिली.

धनगर समाजाच्या मेळाव्यात उपस्थित समाजबांधव, कार्यकर्ते.
धनगर समाजाच्या मेळाव्यात उपस्थित समाजबांधव, कार्यकर्ते.

मविआला घ्यायचेच माहित

अतुल सावे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराबाबत टीका केली. ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारला फक्त घ्यायचे माहीत होते. त्यामुळे केवळ आणि आने दो तो असेच ते म्हणत होते. माझ्या ओबीसी मंत्रालयाच्या वतीने ओबीसींचे प्रश्न मोठ्या प्रमाणात सोडण्यात येत आहेत. धनगर समाजासाठी एक हजार कोटीच्या निधीच्या संदर्भात देखील हा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून सोडणार असल्याचा आश्वासन अतुल सावे यांनी दिले.

मविआने प्रश्न सोडवले नाही- भुमरे

पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी देखील धनगर समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्न करणार असून याबाबत मुख्यमंत्र्यांना देखील भेटणार असल्याचं त्यांनी सांगितले तर महाविकास आघाडीच्या काळात कुठलाही प्रश्न सुटला नसल्याची टीका भुमरे यांनी केली.

भुमरेंनी सरकारमध्ये काय काम केले - दानवे

विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी भुमरे यांच्यावर टीका करत महाविकास आघाडीच्या काळात मंत्री होते, मग त्यांनी काय काम केले? फडणवीस यांनी धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात घोषणा केली, मात्र त्यांच्या काळात धनगर समाजाला आरक्षण मिळालेच नाही अशी टीकाही दानवे यांनी केली.

धनगर आरक्षणासाठी प्रयत्नशिल - कराड

केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी धनगर समाजाच्या प्रश्नावर बोलताना धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...