आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा''महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेमध्ये धनंजय मुंडे यांनी भाजपवर जोरदार टीका केली.सहा एप्रिल हा भाजपचा वर्धापन दीन आहे. मात्र एक एप्रिल या दिवशी जी चेष्टा केली जाते त्याच दिवशी भाजपचा वर्धापन दिवस चेष्टा दिवस आहे. दहा वर्षे सरकारने चेष्टा केली आहे. बजेटमध्ये घोषणा केल्या त्यामध्ये देखील चेष्टाच होती असा घणाघात राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केला; तर 180 जागी महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकणार असा दावा काॅंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला.
वाॅटरग्रीड योजना केंद्राकडे ढकलली
धनंजय मुंडेंनी टीका केली की, वॉटर ग्रीड बाबतचा विषय केंद्राकडे ढकलून दिला आहे. सरकार विरोधात कोणी काय बोलले तर पोलीस कधी घरी येईल हे सांगता येत नाही.सरकारला आता चोर म्हणू शकत नाही.चोर म्हणले की सदस्यत्व रद्द होत आहे. हे राहुल गांधी बाबत पहायला मिळाले आहे. सरकार वज्रमूठ बाबत इतके घाबरले आहे की यात्रा काढत आहे अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे.
महाविकास आघाडी 180 जागा जिंकणार - बाळासाहेब थोरात
बाळासाहेब थोरात म्हणाले की, कोरोना काळात उद्धव ठाकरेंचे बोलणे म्हणजे कुटुंबातला माणूस बोलत आहे हे वाटत होते. त्यांनी ती जबाबदारी पार पडली. सध्याच्या सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही. कांद्याबाबत नुकसान झाले. खरेदी नाही, अतीशय वाईट अवस्था आहे.
थोरात म्हणाले, आज देशात माहोल कोणी बोलेल तर घरी इडी येईल. घटनेत वाद विवाद मतांतरे मान्य आहेत. पण या केंद्र आणि राज्य सरकारला हे चालत नाही. राहुल गांधी यांनी काढलेल्या पद यात्रेला प्रतिसाद मिळाला. केवळ अदानी बाबत 20 हजार कोटी कसे आले हे विचारले तर खासदारकी काढून घेतली जात आहे. एका सर्व्हेत महाराष्ट्र मध्ये 38 खासदार महाविकास आघाडीचे येणार आहे. कर्नाटक मध्ये काँग्रेस सरकार येत आहे.
आमच्या वर जबाबदारी आहे. आम्ही एकत्र आलो तर 180 जागा जिंकू. उद्धव ठाकरे सभा घेत आहेत. खेडची सभा झाली, आता पुण्यात देखील मोठी सभा होणार आहे असेही थोरात यांनी सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.