आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीड:पंकजांनी विकासासाठी दिल्या शुभेच्छा; अनेक वर्षे शुभेच्छा द्याव्या लागतील म्हणत, बंधू धनंजय यांच्याकडून स्वीकार

पाटोदाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गहिनीनाथ गडाने बहिण-भावाला आणले एकाच मंचावर

विकास करण्याची जबाबदारी विद्यमान सत्ताधारी मंडळींवर असून जिल्ह्याच्या विकासासाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी सत्ताधाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. त्याचा स्वीकार करत जिल्ह्यात येत्या चार वर्षांत विकासाची अशी कामे करू की पुढील अनेक वर्षे आम्हाला त्यांना शुभेच्छाच द्याव्या लागतील, असा टोला पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्या शुभेच्छांना उत्तर देताना लगावला.

संत वामनभाऊ महाराजांच्या ४५ व्या पुण्यतिथीनिमित्त पाटोदा तालुक्यातील गहिनीनाथ गडावर कार्यक्रम घेण्यात आला. व्यासपीठावर पंकजा यांच्यासह पालकमंत्री धनंजय मुंडे व खासदार डॉ. प्रीतम मुंडे, शिवसेनेचे नेते जयदत्त क्षीरसागर, माजी आमदार भीमराव धोंडे आदींची उपस्थिती होती. संत वामनभाऊ यांच्या समाधी मंदिरात शुक्रवारी पहाटे पालकमंत्री धनंजय मुंडे व गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज यांच्या हस्ते पारंपरिक महापूजा करण्यात आली. या वेळी बोलताना पंकजा म्हणाल्या की, गहिनीनाथ गड तमाम भाविकांचे श्रद्धास्थान आहे. कुठेही असो हा क्षण कधी चुकवू दिला नाही. तुमच्या सर्वांमध्ये मला वामनभाऊंचे दर्शन घडते म्हणून तुमच्या दर्शनासाठी मी इथे येते. पालकमंत्री असताना गडाच्या विकासाकरिता योगदान दिले, पुढेही देत राहू. आपण मिळालेल्या संधीचं सोनं केलं, भविष्यातही करू.

बीड जिल्ह्याच्या विकासासाठी सत्ताधाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी बोलताना पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, माजी पालकमंत्र्यांनी दिलेल्या शुभेच्छा घेऊन जिल्ह्यात येत्या चार वर्षांत विकासाची अशी कामे करू की पुढील अनेक वर्षे त्यांना आम्हाला शुभेच्छा द्याव्या लागतील. रखडलेले २३ कोटी रुपये व अधिकचे ५ कोटी रुपये निधी राज्य सरकारच्या माध्यमातून या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी येत्या दोन वर्षांत उपलब्ध करून देऊ, असा शब्दही धनंजय मुंडे यांनी दिला. बजरंग सोनवणे, माजी आमदार साहेबराव दरेकर, आ. बाळासाहेब आजबे, सतीश शिंदे, जयदत्त धस, शिवभूषण जाधव, अप्पासाहेब राख, अण्णासाहेब चौधरी, विठ्ठल सानप, विश्वास नागरगोजे, शिवाजीराव नाकाडे, सतीश बडे यांच्यासह गडाचे वारकरी-टाळकरी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जेसीबीने फुलांची उधळणपंकजा मुंडे व खासदार डाॅ. प्रीतम मुंडे यांचे गहिनीनाथ गडावर आगमन झाल्यानंतर त्या व्यासपीठाकडे जाताना कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे व खासदार डाॅ. प्रीतम मुंडे यांच्यावर जेसीबीने फुलांची उधळण करत जल्लोषात स्वागत केले. या स्वागताने मुंडे भगिनी भारावून गेल्या होत्या.

ओवीबद्ध ग्रंथाचे प्रकाशनसंत वामनभाऊ यांच्या जीवनचरित्रावर आधारित ओवी स्वरूपातील ग्रंथाचे या वेळी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या ग्रंथाचे लेखन संत एकनाथ महाराज यांचे १४ वे वंशज प्रमोद दिगंबर महाराज यांनी केले असल्याची माहिती विठ्ठल महाराजांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...