आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दांडिया:किरायाच्या फॅन्सी ड्रेसवर दांडियात धूम; भाडे 300 ते 1500

औरंगाबाद8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवरात्रोत्सवात आकर्षक वेशभूषेत दांडिया खेळण्याची प्रत्येकाची इच्छा असते. पण, दररोज नवा ड्रेस खरेदी करणे खिशाला परवडणारे नाही. त्यामुळे भाड्याने ड्रेस घेणे हा पर्याय आहे. शहरातील विनीता गंगापूरवाला यांनी अशाच निकडीतून भाड्याने कपडे देण्याचा व्यवसाय सुुरू केला होता. दिवसभरात त्यांच्याकडून किमान १०० लोक कपडे भाड्याने नेतात.

एकट्या गंगापूरवाला यांच्याकडे ८०० ते ९०० विविध प्रकारची वस्त्रे आहेत. यामध्ये लहान मुलांसाठीही अनेक प्रकारचे कपडे आहेत. असे अजून काही व्यापारी आहेत. लहान मुलांच्या कपड्यांचे भाडे प्रतिदिन १५० ते ५०० रुपये तर मोठ्यांचे ३०० ते १००० रुपयांपर्यंत भाड्याने मिळतात. कपल ड्रेसिंगचे भाडे १२०० ते १५०० रुपयांपर्यंत आहे. परत आलेला ड्रेस ड्रायक्लीन करुनच इतरांना देतो, असे विनीता म्हणाल्या. प्रत्येक ड्रेससोबत त्याला शोभणारे दागिनेही उपलब्ध असून या काळात त्याला मागणी आहे.

प्रश्नातून सुचला व्यवसाय
मागील १४ वर्षांपासून विनीता यांनी हा व्यवसाय गरजेसाठी सुरू केला आहे. त्या म्हणाल्या, नक्षीकाम, काचकाम असलेल्या कपड्यांच्या किमती सामान्यांना परवडणाऱ्या नसतात. शिवाय नवरात्रीतील ९ दिवसांखेरीज ते कपडे वापरता येत नाहीत, म्हणूून एवढी गुंतवणूक कशी करावी, हा प्रश्न अनेकांना पडतो. अशीच अडचण मला आली होती. त्यातून हा व्यवसाय सुरू करण्याची आयडिया मला सुचली.