आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Dhoot Hospital Auranagabad Doctor Lila Bhujabal Accident And Death In Dhoot Hospital | In The Same Hospital Where She Served For 20 Years, The Female Doctor Breathed Her Last

सकाळी फिरायला गेल्यानंतर अपघात:ज्या रुग्णालयात 20 वर्षे सेवा केली, त्याच रुग्णालयात महिला डॉक्टरने घेतला अखेरचा श्वास

औरंगाबाद17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्या रुग्णालयात जवळपास वीस वर्षे रुग्णांची सेवा केली त्याच रुग्णालयात महिला डॉक्टरने शेवटचा श्वास घेतला. पहाटे पती सोबत सकाळी फिरायला गेल्यानंतर मागून आलेल्या सुसाट जडवाहनाने डॉ. लीला नामदेव भुजबळ (46) यांना उडवले. धडकेत त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली, तर त्यांचे पती नामदेव हे देखील जखमी झाले. स्थानिकांनी धाव घेत त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, दोन तास डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही लीला यांचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी सहा वाजता नव्याने तयार झालेल्या सोलापूर धुळे महामार्गावर हा अपघात झाला. वाहनचालक मात्र अपघात होताच फरार झाला.

कसा झाला अपघात?

गांधेली शिवारात एक मुलगा, दोन मुली व पतीसह राहणाऱ्या डॉ. लीला मागील वीस वर्षांपासून जालना रोडवरील धूत रुग्णालयात नोकरीस होत्या. गांधेली शिवरातून रोज त्या रुग्णालयात सेवा बजावण्यासाठी येत असे. मागील काही दिवसांपासून त्या पती सोबत सकाळी फिरायला जात होत्या. शहर व गांधेली शिवारा दरम्यान नव्यानेच सोलापूर - धुळे महामार्ग तयार झाला आहे. घराजवळ असल्याने भुजबळ दांपत्य येथे रोज सकाळी फिरण्यासाठी जात होते. बुधवारी देखील सकाळी सहाला घरी निघाले. मात्र, थोड्या अंतरावर जाताच मागून आलेल्या जड वाहनाने लीला यांना जोरात धडक दिली. यात वाहनाच्या मागील बाजू थेट डोक्याला लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या, तर नामदेव हे देखील जखमी झाले. स्थानिक गावकरी शेतात जात असताना त्यांनी हा प्रकार पाहिली. त्यांना धूत रुग्णालयात दाखल केले. मात्र, दहा वाजता लीला यांचा मृत्यू झाला. हे कळताच डॉक्टर, परिचारिकांना अश्रू अनावर झाले. तर गांधेली गावावर देखील शोककळा पसरली.

चालकाचा शोध सुरू

घटनेची माहिती मिळताच चिकलठाणा पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. चालक फरार झाल्याने सीसीटीव्ही कॅमऱ्याच्या मदतीने त्याचा शोध सुरू करण्यात आला. दरम्यान, सकाळी अनेक रस्त्यांवर वाहन सुसाट वेगात जातात. अनेकांचे वेगावर नियंत्रण नसते. त्यामुळेसकाळी फिरायला जाताना नागरिकांनी काळजी घेण्याची गरज असल्याचे मत पोलिसांनी व्यक्त केले आहे. शहरात महिन्याभरात दुसऱ्यांदा महिला डॉक्टरचा मृत्यू झाल्याने मेडिकल क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...